नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट शुक्रवारी (२८ सप्टेंबर रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त १ कोटी ३० लाख एवढाच व्यवसाय केला अन् दुसऱ्या दिवशीही याच्या कमाईत घसरण बघायला मिळाली. चित्रपटसृष्टीतील बऱ्याच लोकांनी या चित्रपटाकडे कानाडोळा केला असला तरी बॉलिवूडमधील अभिनेता व स्वघोषित समीक्षक केआरके म्हणजेच कमाल आर खान याने यावर टिप्पणी केली आहे.

आणखी वाचा : ‘केजीएफ ३’च्या रिलीज डेटबद्दल निर्मात्यांचा मोठा खुलासा; ‘रॉकी भाई’च्या रूपात पुन्हा झळकणार सुपरस्टार यश

ट्वीटच्या माध्यमातून ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या पहिल्या दिवसाचे कमाईचे आकडे शेअर करत विवेक अग्निहोत्री यांना चांगलाच टोला लगावला आहे. आपल्या ट्वीटमध्ये केआरके लिहितो, “द व्हॅक्सिन वॉरने पठाण, गदर २ व जवान या तीनही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. विवेक अग्निहोत्री यांना आता कळून चुकलं असेल की बॉलिवूडमधील मंडळी त्यांना दिग्दर्शक म्हणून का मान्यता देत नाहीत?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थात यात केआरके ने लिहिलेले आकडे आणि समोर येणारे आकडे यात बरीच तफावत आपल्याला पाहायला मिळते. विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये नाना पाटेकर, पल्लवी जोशी, गिरिजा ओक, रायमा सेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबरोबरच पुलकित सम्राट, रिचा अन् पंकज त्रिपाठी यांचा ‘फुकरे ३’सुद्धा प्रदर्शित झाला आहे.