बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश होतो. रणबीर कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नुकताच त्याचा ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. या चित्रपटात पहिल्यांदाच तो पत्नी आलिया भट्ट बरोबर झळकला होता. रणबीरकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये तो झळकणार अशी चर्चा आहे.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनिल कपूरपर्यंत या कलाकारांनी हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रणबीरने नुकतीच रेड सी चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. या महोत्सवादरम्यान रणबीर कपूर भरभरून बोलला आहे. त्याला भविष्यातील कामाबद्दल विचारण्यात आले असता तो म्हणाला, “मला नेहमीच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात रस होता मात्र वास्तवात मी एक चांगला लेखक नसल्याने मी हे धाडस करू शकत नाही. मी लेखक नाही तसेच माझ्या कल्पना माझे विचार मला इतरांच्या बरोबर शेअर करताना थोडे लाजल्यासारखे होते. यावर मी काम करत आहे. मला लवकरच दिग्दर्शन सुरु करायचे आहे तसेच त्यात अभिनयदेखील करायचा आहे.”

मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी

आलियाच्या हॉलीवूडपदार्पणवर त्याने भाष्य केलं तो म्हणाला, “ती लवकरच हॉलिवूडमध्ये दिसेल मात्र माझा असा कोणताच विचार नाहीये. मी माझ्या देशात माझ्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणार आहे यात मी खुश आहे.” आलिया भट्ट लवकरच ‘द हार्ट ऑफ स्टोन’ या चित्रपटात झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर कपूर लवकरच ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.