राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारकास्ट चित्रपट ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर जुहू येथे पार पाडला. या प्रीमियरला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या प्रॉडक्शनबरोबर सर्वात जास्त काम करणारा अभिनेता सलमान खानने हजेरी लावली होती. यावेळी त्याने माध्यमांशी संवाद साधला.

सलमानने या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली आणि त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली, तसेच सुरज बडजात्या यांच्याकडे बघत तो म्हणाला आज मी जो काही आहे तो या व्यक्तीमुळे ( सुरज बडजात्या) आहे. सलमानने ‘उंचाई’ चित्रपटाचे कौतूक केले तो म्हणाला, मी चित्रपट पाहिलेला नाही मी बाकीच्या दिग्दर्शकांबद्दल बोलणार नाही मात्र यांच्यावर मला प्रचंड आत्मविश्वास आहे ते जे काही बनवतील ते उत्तमच असेल. अशा काळात असा चित्रपट बनवणे, ज्येष्ठ नागरिक आणि मैत्रीवर चित्रपट बनवणे, हा खूपच अवघड चित्रपट आहे.

Dibakar Banerjee on Sushant Singh Rajput death
सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याचं दुःख कुणालाच नाही, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे स्पष्ट मत; म्हणाले, “त्याच्या निधनानंतर शोकसभा…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Madhuri Dixit cried ranjeet scene
विनयभंगाच्या सीनआधी खूप रडली होती माधुरी दीक्षित, काम करण्यास दिलेला नकार; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितली आठवण
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या

Photos : सलमान खान ते अक्षय कुमार ; ‘उंचाई’च्या प्रीमियरला बॉलिवूड सेलिब्रिटींनी लावली हजेरी!

सूरज बडजात्या यांच्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने सलमानला त्याच्या करिअरच्या सुरुवातीला स्टार बनवले होते. या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले होते. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ हैं’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटांमध्ये सलमान खानने काम केलं आहे. या सगळ्याच चित्रपटांमध्ये तो प्रेम या व्यक्तिरेखेत दिसला आहे.

चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात. या चित्रपटात अमिताभ बच्चन बोमन इराणी, डॅनी डेंग्झोपा, अनुपम खेर तसेच अभिनेत्री नीना गुप्ता, सारिका परिणीती चोप्रा यांचादेखील मुख्य भूमिका आहेत.