बॉलीवूडचे सेलिब्रिटी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याविषयी जितकं बोललं जातं तितकंच त्याच्या खासगी आयुष्याविषयी चर्चा रंगलेली असते. सध्या आलिया भट्ट तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. ती रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या ब्रेकअपविषयी स्पष्टच बोलली आहे.

दरम्यान, रणबीर-कतरिनाच्या ब्रेकअपनंतर आलिया रणबीरला डेट करून लागली. बराच काळ डेट केल्यानंतर गेल्यावर्षी दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नानंतरच्या काही महिन्यांनंतर दोघांनी आनंदाची बातमी दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कपूर कुटुंबात राहाचं आगमन झालं. आता राहा एकवर्षाची झाली आहे. अशातच आलिया भट्ट अलीकडेच नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. तेव्हा ती पती रणबीर कपूरच्या पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबरच्या ब्रेकअपविषयी खुलेपणाने बोलली.

हेही वाचा – “बंद करू नका…”, ‘नवा गडी नवं राज्य’ मालिका ऑफ एअर होतं असल्यामुळे प्रेक्षक नाराज, म्हणाले…

जेव्हा रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपच्या मुख्य कारणाबाबत तिला प्रश्न विचारला गेला. तेव्हा आलिया म्हणाली, “रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपचं कारण मी असल्याचं अनेक ठिकाणी वाचलं. हे माझ्यासाठी खूप हास्यास्पद होतं. त्यामुळे यावर स्पष्टीकरण द्यावं असं मला अजिबात वाटतं नाही.” आलिया याच वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘जिगरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात आलिया फक्त प्रमुख भूमिकेत नाही तर धर्मा प्रोडक्शनबरोबर निर्मितीचे देखील काम करतेय. ‘जिगरा’ या चित्रपटात आलियाबरोबर शोभिता धुलिपाला देखील पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.