आलिया भट्ट व रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. दोघांचे व्हिडीओ, फोटो हे सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघं आई-बाबा झाले. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचं नाव राहा असं आहे. राहा उद्या एक वर्षांची होणार आहे. पण सोशल मीडियावर अजूनपर्यंत आलिया-रणबीरने लेकीचा एकही फोटो शेअर केला नाही. त्यामुळे दोघांचे चाहते राहाची पहिली झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अशातच आलियाने राहाचा पहिला फोटो कधी शेअर करणार, याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – हार्दिक जोशीचं ‘झी मराठी’वर पुन्हा कमबॅक! राणादा लवकरच घेऊन येणार नवीन रिअ‍ॅलिटी शो, जाणून घ्या…

‘हिंदुस्थान टाइम्स’च्या लीडरशीप समिट २०२३मध्ये अभिनेत्री आलिया भट्ट सहभागी झाली होती. त्यावेळी तिला विचारलं की, चाहते राहाची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत. यावर आलिया म्हणाली की, मी माझ्या मुलीचा चेहरा लपवते, असं मला वाटतं नाही. मला माझ्या मुलीवर खूप गर्व आहे. सुरुवातीलाच आम्ही राहाचा चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. कारण आम्ही नवे पालक होतो आणि ती एक वर्षाची देखील नव्हती. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हावा आणि तिला आता पापाराझीची गरज आहे, असं आम्हाला वाटतं नाही. ती आता खूपच छोटी आहे.

पुढे आलिया म्हणाली की, आम्ही राहाचा चेहरा कोणालाच दाखवत नाही, असं अजिबात नाही. पण जेव्हा आम्हाला वाटले ही वेळ योग्य आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. तेव्हा आम्ही राहाची पहिली झलक दाखवू. ही गोष्टी आता कधी ही घडू शकते, लवकरच होऊ शकते. आम्ही ज्यावेळेस तयार होऊ, त्यावेळेस आम्ही आवश्य तिची पहिली झलक दाखवू.

हेही वाचा – “घर छोटं आहे पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला लागली म्हाडाच्या घराची लॉटरी, स्नेहल शिदम म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया-रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तसेच रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. तसेच आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.