बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असते. मेट गाला २०२३ मध्ये आलियाच्या पदार्पणानंतर अनुष्का कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू करणार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये अनुष्काबरोबर टायटॅनिक अभिनेत्री केट विन्सलेटही दिसणार आहे.

हेही वाचा- दिवंगत सुशांत सिंह राजपूतला मोठ्या पडद्यावर पाहता येणार, ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या दिवशी पुन्हा प्रदर्शित होणार, कारण…

गेल्या वर्षी, दीपिका पदुकोणने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ती कान्स ज्युरीचा भाग होती. यावर्षी अनुष्का शर्मा कान्समध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनेन यांनी ट्विटरवर विराट कोहली आणि अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला असून, अनुष्काच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- स्विमिंग पूलमध्ये सारा अली खानसह दिसणारा ‘मिस्ट्री मॅन’ कोण? व्हायरल फोटोनंतर चर्चांना उधाण

फ्रान्सच्या राजदूतांनी लिहिले की, “विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना भेटून आनंद झाला. मी विराट आणि टीम इंडियाला आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि अनुष्काच्या कान फिल्म फेस्टिव्हलच्या सहलीबद्दल चर्चा केली आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कान्स चित्रपट महोत्सव’ यावर्षी १६ मे ते २७ मे दरम्यान होणार आहे.अनुष्का कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यापूर्वी, दीपिका, ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली आहे.