95th Academy Awards 2023 : ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि आज झालेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. या सोहळ्याला चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होतीच तसेच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनेदेखील हजेरी लावली. यावेळी तिच्या ड्रेस व लूकची चांगली चर्चा रंगली आहे.

दीपिका पदुकोण कायमच हटके फॅशनमुळे चर्चेत येत असते. दीपिका पदुकोण ही या सोहळ्यात पुरस्कार जाहीर करताना (presenter) म्हणून दिसली आहे. या पुरस्कार सोहळ्यसाठी तिने खास काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. बन हेअरस्टाइल व मेकअप करत करत दीपिकाने ग्लॅमरस लूक केला होता. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करताच अनेकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Oscar Awards 2023 : “खरा भारतीय…” ऑस्कर सोहळ्यातील ज्यु. एनटीआरच्या देसी लूकचं कौतुक; व्हिडीओ व्हायरल

दीपिकाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांप्रमाणे कलाकारदेखील कमेंट करत आहेत. आलिया भट्टने “uff stunner” अशी कमेंट केली आहे. तर आरजे मलिष्कानेदेखील कमेंट केली आहे ती असं म्हणाली, “खूपच सुंदर,” काहींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची तुलना तर राजकन्येशी काही लोकांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दीपिकाने आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. पठाणमध्ये तिचा बोल्ड अंदाज दिसला आहे. आता लवकरच ती दाक्षिणात्य अभिनेता प्रभासबरोबर ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात झळकणार आहे.