कुणाल खेमू दिग्दर्शित ‘मडगांव एक्सप्रेस’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाचं कौतुक देखील होत आहे. या चित्रपटात दिव्येंदू शर्मा, प्रतिक गांधी, अविनाश तिवारी, उपेंद्र लिमये, छाया कदम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. याशिवाय या चित्रपटात ग्लॅमरस डान्सर, अभिनेत्री नोरा फतेही झळकली आहे. या चित्रपटामुळे सध्या नोरा चर्चेत आली आहे.

‘मडगांव एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिव्येंदू, अविनाश आणि नोरा नुकतेच ‘मॅशबल इंडियन’ या युट्यूब चॅनलच्या ‘द बॉम्ब जर्नी’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी नोरा फतेहीने मुंबईतील सुरुवातीचा संघर्ष काळ सांगितला. ती म्हणाली, “जेव्हा मी भारतात पहिल्यांदा आली तेव्हा माझ्या जवळ ५ हजार रुपये होते. यावेळेस मला १०० डॉलर म्हणजे किती असतात हे अजिबात माहित नव्हतं. मी एका अपार्टमेंटमध्ये राहत होते. थ्री-बीएचके घर होतं. प्रत्येक रुममध्ये तीन मुली राहत होत्या, अशा एकूण नऊ वेड्या मुलींबरोबर मी राहत होते. हे माझ्यासाठी ट्रॉमा पेक्षा काही कमी नव्हतं. कधी कधी मला असं वाटायचं की, माझा भारतात येण्याचा निर्णय योग्य होता की चुकीचा होता.”

हेही वाचा – ‘मास्टरशेफ इंडिया’ फेम कुणाल कपूरच्या झाला घटस्फोट, पत्नीच्या त्रासाला कंटाळून हायकोर्टात घेतली होती धाव

पुढे नोरा म्हणाली, “संघर्षाच्या काळात माझ्याकडे खूप कमी पैसे होते. त्यामुळे मी फक्त अंडी आणि ब्रेड खाऊन दिवस काढले. माझ्या घराचं भाडं मी ज्या एजन्सीत काम करत होती तेच देत होते. पण माझ्या पगारातून घराचं भाडं कापलं जात होतं. त्यामुळे माझ्या हातात येणारा पगार खूप कमी होता. त्या पगारात मुंबई सारख्या शहरात राहणं खूप कठीण आहे.”

याआधी नोरा तिच्या संघर्षाविषयी अनेकदा बोलली होती. २०१९मध्ये एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती, “संघर्षाच्या काळात ज्या एजन्सीत काम केलं ते आठवड्याचे फक्त तीन हजार रुपये देत होती. त्यामुळे संपूर्ण घर खर्च करून आठवड्याच्या शेवटी हातात पैसे नसायचे.”

हेही वाचा – निळू फुलेंचे जावई झळकले लोकप्रिय मालिकेत, साकारतायत ‘ही’ महत्त्वाची भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नोरा ही ३२ वर्षांची आहे. या वयात ती बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराने टेलिव्हिजनवरील अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोचे परीक्षण केलं होतं. याशिवाय ती ‘स्त्री’, ‘बाटला हाउस’, ‘बाहुबली द बिगनिंग’, ‘क्रँक’ यांसारख्या चित्रपटात झळकली आहे. नोराच्या अभिनयापेक्षा तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत.