यंदा बॉक्स ऑफिसवर बॉलीवूडच्या किंग खानच्या चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे. शाहरुख एकापाठोपाठ एक ब्लॉकबस्टर चित्रपट देत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाने धुमाकूळ घातला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात किंग खानच्या ‘जवान’ चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडून बक्कळ कमाई केली. आता अभिनेत्याचा राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज ‘डंकी’ चित्रपटातील पहिलं जबरदस्त गाणं प्रदर्शित झालं आहे.

शाहरुख खानच्या ‘डंकी’ चित्रपटातील ‘लुट पुट गया’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. याला ‘डंकी ड्रॉप २’ असं म्हटलं आहे. सध्या शाहरुखच्या या नव्या गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या गाण्यामध्ये शाहरुख आणि तापसी पन्नू याच्यातील रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – भूमी पेडणेकरला डेंग्यूची लागण; अभिनेत्री माहिती देत म्हणाली, “मित्रांनो सावध …”

‘डंकी’ चित्रपटातील ‘लुट पुट गया’ हे गाणं प्रीतम यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर स्वानंद किरकिरे आणि आयपी सिंह यांनी गाण्याचे बोल लिहिले असून लोकप्रिय गायक अरिजित सिंहने हे गाणं गायलं आहे. तसेच गणेश आचार्य यांनी गाण्यातील नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

हेही वाचा – Video: सलमान खानने भरगर्दीत महिलेला केलं किस; व्हायरल व्हिडीओमधील ‘ती’ महिला कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुखचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख, तापसी व्यतिरिक्त विक्की कौशल पाहायला मिळणार आहे. ‘डंकी’ हा चित्रपट अवैध स्थलांतर या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.