येत्या शुक्रवारी जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मल्याळम दिग्दर्शन मथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचे केले आहे. त्यांच्याच २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हेलन’ या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. बोनी कपूर यांनी ‘मिली’ची निर्मिती करण्यासाठी ‘हेलन’ चित्रपटाचे हक्क विकत घेतले होते. जान्हवीसह सनी कौशल, मनोज पाहवा, संजय सुरी अशा कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. या वर्षातला हा जान्हवीचा दुसरा चित्रपट आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट थेट ओटीटीवर दाखल झाला होता.

मराठमोळ्या ‘सैराट’च्या रिमेकमध्ये जान्हवी दिसली होती. ‘धडक’ हा तिचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे निर्माता करण जोहरने तिला लॉन्च केले होते. आतापर्यंत तिने ‘गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’, ‘रुही’, ‘गुल लक जेरी’ आणि ‘मिली’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मिली’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यामध्ये जान्हवी आणि बोनी कपूर सध्या व्यग्र आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये त्यांनी जान्हवीला लॉन्च का केले नाही या प्रश्नाचे उत्तर दिले.

आणखी वाचा – “मराठी चित्रपट कात टाकून पुढे जातोय, याचं श्रेय…”; राज ठाकरेंनी ‘या’ व्यक्तीचं केलं विशेष कौतुक

दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, “आधी अनिल आणि काही वर्षांनी संजय अशा माझ्या दोन्ही भावांना मी बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. ते करण्यापासून मला कोणी रोखणारही नव्हतं. मी साखरेमध्ये गूळ मिसळत होतो आणि यात इतका रमलो की, मला मधुमेह झाला. माझ्या भावांच्या पदार्पणासाठी मी कोणतीही कसर सोडली नाही.”

आणखी वाचा – शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या दोन चाहत्यांचे आयफोन चोरीला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते पुढे म्हणाले, “त्यांच्यासाठी मी पाण्यासारखे पैसे खर्च केले. या अनुभवानंतर मग मी ठरवलं की, माझ्या मुलांना लॉन्च करणार नाही. एकदा की ते बॉलिवूडमध्ये स्थिरावले की मी त्यांच्यासाठी चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार नक्की करणार आहे.” जान्हवीप्रमाणे अर्जुन कपूरच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करणे बोनी कपूर यांनी टाळले. त्याच्या ‘इशकजादे’ या चित्रपटाची निर्मिती यशराज प्रॉडक्शन्सच्या आदित्य चोप्रा यांनी केली होती.