बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खानचा ‘चक दे इंडिया’ चित्रपट तुम्हाला आठवतच असेल. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटात शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. ‘चक दे इंडिया’ चित्रपटातून अभिनेत्री विभा छिब्बर चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या. या चित्रपटात त्यांनी कृष्णाजी हे पात्र साकारले होते. दरम्यान, एका मुलाखतीत विभा छिब्बर यांनी ‘चक दे इंडिया’दरम्यानचा शाहरुख खानबरोबरचा एक किस्सा शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “तुमच्या मुलाला खूप…”, ‘अ‍ॅनिमल’ मध्ये रणबीर कपूरसह काम केल्यानंतर दिग्गज अभिनेत्याने नीतू कपूर यांना केला होता मेसेज

विभा छिब्बर म्हणाल्या, “शाहरुख खान बोलायला खूप छान व नम्र व्यक्ती आहे. ‘चक दे इंडिया’चे शूटिंग करताना आम्ही सगळेच नवीन होतो आणि घाबरले होतो याची त्याला कल्पना होती. मी त्याच्यासारख्या को-स्टारबरोबर कधीही काम केले नाही. त्याच्याबरोबर काम करणे हा एक अद्भुत अनुभव होता. जेव्हा मला आमचा पहिला सीन एकत्र शूट करायचा होता, तेव्हा मी खूप घाबरले होते. माझे हृदय धडधडत होते. मी व शाहरुख जेव्हा संवादाचा सराव करायचो. तेव्हा तो चालत चालत कॉफी प्यायचा. अनेकदा गमती गमतीत त्याने माझ्यावर कॉफी टाकल्याचे नाटक केले आहे. त्या वेळेस मला खूप भीती वाटली होती.”

विभा पुढे म्हणाल्या, “चक दे इंडिया या चित्रपटाच्या वेळेस माझी मुलगी फक्त ११ वर्षांची होती. तिला माझी सतत आठवण यायची आणि ती खूप रडायची. एक दिवस शाहरुख खान स्वत: माझ्या मुलीबरोबर बोलला. तिला खूप आनंद झाला. शाहरुखला आऊटडोअर शूटिंग बिलकूल आवडत नाही. कारण- त्याला घरी त्याच्या मुलांबरोबर वेळ घालवायला आवडतं. ‘चक दे इंडिया’नंतर जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तेव्हा शाहरुख मला नेहमी मिठी मारतो आणि हे खूप सुंदर आहे.”

हेही वाचा-

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झाले, तर त्याच्या ‘पठाण’, ‘जवान’ चित्रपटांनी जगभरात दोन हजार कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. आता २१ डिसेंबरला त्याचा ‘डंकी‘ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरघोस प्रसिसाद मिळला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख बरोबर अभिनेत्री तापसी पन्नू, विक्की कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chak de india actor vibha chibber reveals work experience with shah rukh khan she said he pretended to throw coffee on me dpj
First published on: 18-12-2023 at 12:17 IST