बॉलीवूडमधील दमदार अभिनेत्री अशी ओळख असलेली सान्या मल्होत्रा सध्या ‘कटहल’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘दंगल’ चित्रपटामुळे सान्याच्या करिअरला एक वेगळे वळण मिळून ती घरघरांत पोहोचली. सान्याने तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून आनंदाची बातमी देत आपल्या आलिशान फ्लॅटमधील गृहप्रवेशाचे काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा : ‘मैं अटल हूं’ पंकज त्रिपाठींनी साकारला हुबेहूब लुक! व्हिडीओ शेअर करत सांगितले अटलजींचे विचार

अभिनेत्री सान्या मल्होत्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर नव्या घरातील गृहप्रवेश पूजेचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंना सान्याने “नया घर” अशी कॅप्शन दिल्यामुळे चाहत्यांना या निमित्ताने तिच्या नव्या घराची एक झलक पहायला मिळाली. सान्याच्या नव्या घराचे फोटो पाहून चाहत्यांसह बॉलीवूडमधील काही कलाकारांनी तिचे कौतुक करीत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गृहप्रवेशासाठी सान्याने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसत पारंपरिक पोशाख केला होता. तिची ‘दंगल’मधील सहकलाकार फातिमा सना शेखने या पोस्टवर ‘लव्ह’ अशीही कमेंट केली आहे.

हेही वाचा : बहुचर्चित ‘8AM मेट्रो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! उमेश कामत दिसणार ‘या’ भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सान्याकडे सध्या प्रभावी चित्रपटांची रांग लागली आहे. हर्मन बावेजा, मेघना गुलजार, विकी कौशल यांच्यासोबत ती काही आगामी प्रोजेक्ट्सवर काम करीत आहे. सान्याने आयुषमान खुरानासोबत काम केलेल्या ‘बधाई हो’ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.