भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला अश्रू अनावर, म्हणाली, "आज संपूर्ण जग..." | deepika padukone could not hold her tears after seeing responce for pathaan | Loksatta

भर कार्यक्रमात दीपिका पदुकोणला झाले अश्रू अनावर, म्हणाली, “आज संपूर्ण जग…”

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

deepikaa

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सर्वच शोज हाऊसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट त्याचे चाहते एखाद्या उत्सवाप्रमाणे सेलिब्रेट करत आहेत. या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून दीपिकाला अश्रू अनावर झाले.

‘पठाण’ चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहेत, तर जगभरातून ५०० कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. अनेकांनी ‘पठाण’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर्सच बूक केली. तर या चित्रपटाचा शो सुरू असताना चित्रपटगृहतील माहोल कसा असतो हे दर्शवणारे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. अनेक जण चित्रपटगृहातच नाचायला सुरुवात करतात. आता हे सगळं पाहून दीपिका भारावली आहे.

आणखी वाचा : Video: शाहरुख खानसाठी काहीपण! ‘पठाण’ सुरू असताना चाहत्याने चित्रपटगृहात उडवल्या नोटा, व्हिडीओ चर्चेत

या चित्रपटाच्या टीमने नुकतीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी शाहरुख खान, दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम आणि चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद उपस्थित होते. त्या चौघांनीही भरभरून संवाद साधला. चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव, चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद याबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. जेव्हा दीपिकाची बोलण्याची वेळ आली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून ती भावूक झाल्याचं तिने सांगितलं.

हेही वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात परिधान केला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल थक्क

दीपिका म्हणाली, “आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय तो पाहून खूप छान वाटतंय. आतापर्यंत आम्ही चित्रपटाचे स्क्रीनिंग्स करत होतो. इतके दिवस आम्ही घरातून बाहेर पडलो नव्हतो. अनेक व्हिडीओज आमच्या पाहण्यात येत होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता पहिल्यांदाच आम्ही चाहत्यांशी संवाद साधतोय, त्यांच्यात मिसळतोय. आज संपूर्ण जग ज्या परिस्थितून जातंय ते बघता य चित्रपटाने सर्वांना एकत्र आणलंय, प्रेक्षकांच्या आयुष्यात आनंद आणण्याचं काम हा चित्रपट करतोय, हा चित्रपट पाहणं सर्वजण एन्जॉय करत आहेत. ‘पठाण’मुळे सध्या एखाद्या उत्सवासारखं वातावरण निर्माण झालं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे, महनात घेऊन काम करता आणि अखेरीस तुम्हाला हे चित्र पहायला मिळतं तेव्हा त्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:44 IST
Next Story
Pathaan Box Office Collection : ‘पठाण’ची लवकरच होणार ३०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; सोमवारीही चित्रपटाची जबरदस्त कमाई