Deepika Padukone Rejected 7 Bollywood Films : बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या बरीच चर्चेत आहे, याचं कारण आहे ‘कल्की २८९८ एडी’ हा सिनेमा. यामधून अभिनेत्रीला काढून टाकल्यानंतर तिच्याबद्दल अनेक चर्चा होताना दिसत आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का दीपिकाने स्वत: यापूर्वी बॉलीवूडमधील ७ हिट चित्रपटांना नकार दिलेला. कोणते आहेत ते चित्रपट जाणून घेऊयात…
गंगूबाई काठियावाडी
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा त्या वर्षातील सुपर हिट सिनेमा आहे. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार यातील एका महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी दीपिका पादुकोणला विचारणा झालेली. परंतु, तिने ती भूमिका साकारण्यास नकार दिला होता.
जब तक हैं जान
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘जब तक हैं जान’ या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री कतरिना कैफ व अनुष्का शर्मा झळकलेल्या. यामध्ये कतरिनाने साकारलेल्या मीराच्या भूमिकेसाठी तिच्याआधी दीपिका पादुकोणला विचारणा झालेली. परंतु, तिने या चित्रपटाला नकार दिला.
फास्ट अँड फ्युरीयस ७
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या या हॉलीवूड चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळालेला. हा एक अॅक्शन सिनेमा असून यासाठी विचारणा झालेली दीपिका पादुकोण ही एकमेव बॉलीवूड अभिनेत्री होती असं म्हटलं जातं. परंतु, तारखा न जुळल्यामुळे तिला या चित्रपटाला नकार द्यावा लागला. त्यावेळी ती ‘गोलीयो की रास लीला- राम लीला’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होती.
धूम ३
दीपिका पादुकोणला ‘धूम ३’ मधील आलियाचा रोल ऑफर झालेला, परंतु कामाच्या व्यापामुळे तिला या चित्रपटाला नकार द्यावा लागल्याचं म्हटलं जातं.
सुलतान
सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या ‘सुलतान’ चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी दीपिकाला विचारणा झालेली. परंतु, काही कारणांमुळे तिला यामध्ये काम करणं शक्य झालं नाही आणि नंतर या चित्रपटासाठी अनुष्का शर्माला विचारणा झाली. सलमान व अनुष्का यांचा ‘सुलतान’ हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही विचारणा झाल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलेलं.
प्रेम रतन धन पायो
सुलतान चित्रपटापूर्वी दीपिकाला ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटासाठी विचारणा झालेली. परंतु, तिने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर अभिनेत्री सोनम कपूरने यामध्ये सलमान खानबरोबर महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्यावेळी या चित्रपटाची खूप क्रेझ होती.
रॉकस्टार
रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’मधील हीरच्या भूमिकेसाठी दीपिका पहिली पसंती होती. परंतु, यासाठीसुद्धा तारखा न जुळल्यामुळे अभिनेत्रीने नकार दिला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला.