बॉलीवूडचा हँडसम हंक आदित्य रॉय कपूरने पाकिस्तानी अभिनेत्रीला प्रपोज केल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. या अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ज्यात ती व आदित्य रॉय कपूर एकत्र दिसत आहेत.
माही बलोच असं पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास ५ लाख फॉलोअर्स आहेत. तिने आदित्य रॉय कपूरबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत आदित्यच्या हातात पुष्पगुच्छ आहे आणि तो व माही मिठी मारताना दिसत आहेत. ‘अखेर मी होकार दिला’ (And I finally said Yes) असं कॅप्शन तिने फोटोला दिलं आहे.
माहीच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. माही बलोचने शेअर केलेला हा फोटो पाहून आदित्य रॉय कपूरचे चाहते गोंधळले आहेत. माहीने या पोस्टमध्ये आदित्य रॉय कपूरला टॅग केलं आहे. त्यामुळे हे नेमकं काय सुरूये, खरंच आदित्य व माहीचं ठरलंय का? असे प्रश्न चाहत्यांना पडले.
पाहा फोटो-

३२ वर्षांच्या माहीने शेअर केलेला हा फोटो एआयच्या मदतीने तयार केलेला आहे. आदित्य व माहीचा एकमेकांशी काही संबंध नाही. माही आदित्यची चाहती आहे. त्यामुळे तिने हा फोटो एआयच्या मदतीने बनवून पोस्ट केला आहे. माहीचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आदित्य रॉय कपूरने अद्याप लग्न केलेलं नाही. ३९ वर्षांचा आदित्य १३ वर्षांनी लहान अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. दोघेही काही काळ सोबत होते, परदेशात फिरायला देखील गेले होते. पण त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आदित्य सिंगल आहे. पण पाकिस्तानी अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमुळे आदित्यच्या चाहत्यांना मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसतंय.
आदित्य रॉय कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो नुकताच अनुराग बासूच्या ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटात झळकला होता. या सिनेमात त्याच्याबरोबर अभिनेत्री सारा अली खान देखील होती. तसेच नीना गुप्ता, अनुपम खेर, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, अली फझल, फातिमा सना शेख हे कलाकारही चित्रपटात होते. हा चित्रपट थिएटरमध्ये फार चांगली कामगिरी करू शकला नाही. तो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.