Kajol Viral Video: बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर बऱ्याचदा ऊप्स मोमेंट घडत असतात. कधी कोण धडपडत, तर कधी चाहत्यांमुळे ऊप्स मोमेंट घडतात. नुकतीच ऊप्स मोमेंट काजोलबरोबर घडली; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथील एका सलून बाहेर काजोल दिसली होती. तेव्हाच एक वयोवृद्ध चाहता काजोलचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आला आणि त्याने सेल्फीच्या नादात तिच्या पायावरच पाय दिला. याचा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.
काजोल ( Kajol ) गुरुवारी, १३ मार्चला वांद्रे येथील एका सलून बाहेर आल्यानंतर तिच्याबरोबर ही ऊप्स मोमेंट घडली. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफ ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये काजोल जेव्हा सलून बाहेर येते तेव्हा एक वयोवृद्ध चाहता तिच्या जवळ येतो. त्यानंतर तो काजोलचा ऑटोग्राफ घेण्यासाठी तिच्याकडे एक नोटबुक देतो. तेव्हा काजोल त्या नोटबुकवर ऑटोग्राफ देत असताना वयोवृद्ध चाहता तिच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. याच वेळेस सेल्फीच्या नादात वयोवृद्ध चाहता चुकून काजोलच्या पायावर पाय देतो.
वयोवृद्धाचा पाय पायवर पडताच काजोल ( Kajol ) लगेचच मागे होते. त्यानंतर ती संयमाने त्याला ऑटोग्राफ देते. एवढंच नाहीतर वयोवृद्ध चाहत्याला सेल्फीदेखील काढायला देते. त्यामुळे काजोलने या संयमी स्वभावाने अनेक चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, काजोलच्या ( Kajol ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच ती हॉरर चित्रपट ‘मां’ ( Maa Movie ) मध्ये झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. काजोलचा ‘मां’ हा आगामी चित्रपट २७ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात काजोलसह रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि खेरिन शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.