Emergency Box Office Collection Day 19: बॉलीवूडच्या क्विन आणि भाजपच्या खासदार कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. १७ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात २१ महिने भारतात लागू केलेला आणीबाणी काळ दाखवण्यात आला आहे. पण, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. १९व्या दिवशी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने किती कमाई केली? हे समोर आलं आहे.

कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची घोषणा २०२३मध्ये करण्यात आली होती. पण, दोन वेळा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. याचाच परिणाम चित्रपटावर झाल्याचं म्हटलं जात आहे. १७ जानेवारीला प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने काही दिवस कोट्यावधींमध्ये कमाई केली. पण त्यानंतर कमाईत घसरण पाहायला मिळाली. अजूनपर्यंत ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने बजेटचा आकडा देखील पार केला नाही.

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने १९व्या दिवशी म्हणजे ४ फेब्रुवारीला ०.०५ कोटींची कमाई केली आहे. तसंच आतापर्यंत या चित्रपटाने १८.१५ कोटींचा व्यवसाय केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमर्जन्सी चित्रपटाने कोणत्या दिवशी किती केली कमाई?

  • पहिला दिवशी – २.५ कोटी
  • दुसऱ्या दिवशी – ३.६ कोटी
  • तिसऱ्या दिवशी – ४.२५ कोटी
  • चौथ्या दिवशी – १.०५ कोटी
  • पाचव्या दिवशी – १ कोटी
  • सहाव्या दिवशी – १ कोटी
  • सातव्या दिवशी – ०.९ कोटी
  • पहिल्या आठवड्यातील एकूण कमाई – १४.३ कोटी
  • आठव्या दिवशी – ०.४ कोटी
  • नवव्या दिवशी – ०.८५ कोटी
  • दहाव्या दिवशी – १.१५ कोटी
  • अकराव्या दिवशी – ०.२ कोटी
  • बाराव्या दिवशी – ०.२० कोटी
  • तेराव्या दिवशी – ०.२० कोटी
  • चौदाव्या दिवशी – ०.१८ कोटी
  • दुसऱ्या आठवड्यातील एकूण कमाई – ३.१८ कोटी
  • पंधराव्या दिवशी – ०.७ कोटी
  • सोहळ्याव्या दिवशी – ०.१५ कोटी
  • सतराव्या दिवशी – ०.१९ कोटी
  • आठराव्या दिवशी – ०.०७५ कोटी
  • एकोणिसाव्या दिवशी – ०.०५ कोटी
  • आतापर्यंतची एकूण कमाई – १८.१५ कोटी

दरम्यान, ‘इमर्जन्सी’ चित्रपटात कंगना रणौत यांच्या व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. याआधी कंगना यांचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यामुळे ‘इमर्जन्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.