scorecardresearch

जेव्हा इमरान हाश्मीने चांगल्या व वाईट किसबद्दल केलेलं भाष्य, म्हणाला “‘मर्डर’मध्ये मल्लिका शेरावतबरोबर…”

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीचा आज ४४वा वाढदिवस आहे.

emraan hashmi talk about favourite kiss
इमरान हाशमीचा आज ४४वा वाढदिवस आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीचा आज ४४वा वाढदिवस आहे. अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणारा इमरान चित्रपटातील त्याच्या किसींग सीनमुळे विशेष ओळखला जातो. ‘मर्डर’, ‘मर्डर२’, ‘राज ३’, ‘गँगस्टर’, ‘झहर’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘आशिक बनाया आपने’ हे इमरान हाशमीचे गाजलेले चित्रपट.

इमरान हाशमीच्या चित्रपटातील किसिंग व रोमँटिक सीन्सची आजही चर्चा होते. त्याच्या चित्रपटातील किसिंग सीन हिट ठरले आहेत. त्याच्या किसिंग सीनने रेकॉर्डही बनवले आहेत. ‘राज ३’ चित्रपटात इमरान हाशमीने अभिनेत्री इशा गुप्ताला तब्बल २० मिनिटे किस केलं होतं. या किसिंग सीनने एक रेकॉर्ड बनवला होता.

हेही वाचा>> ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत, चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं?

हेही वाचा>> “इंग्रजी चालणार नाही, मराठीत…” चाहत्याच्या कमेंटवर प्रियदर्शनी इंदलकरचं उत्तर, म्हणाली “हे तुम्ही…”

सीरियल किसर अशी ओळख निर्माण करणाऱ्या इमरान हाश्मीने चित्रपटातील त्याला आवडणाऱ्या किसिंग सीनबाबत भाष्य केलं होतं. ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये इमरानने या गोष्टीचा खुलासा केला होता. सगळ्यात चांगल्या व वाईट किसबाबत इमराने सांगितलं होतं. ‘मर्डर २’मध्ये जॅकलीन फर्नांडिसबरोबर केलेल्या किसला इमरानने चांगलं म्हटलं होतं. तर ‘मर्डर’ चित्रपटात मल्लिका शेरावतबरोबर केलेलं किस आवडलं नसल्याचा खुलासा इमरानने केला होता.

हेही वाचा>> “गुडघे काळे पडलेत” शिवाली परबच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट, म्हणाले “पैठणी ड्रेसची वाट…”

इमरान गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘सेल्फी’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याने अक्षय कुमारसह मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 10:49 IST

संबंधित बातम्या