बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे इम्रान हाश्मी. इम्रानने आजवर अनेक चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. प्रतिमा ‘सीरियस किसर’ अशी बॉलिवूडमध्ये झाली. सध्या तो चर्चेत आला आहे. त्याचा ‘सेल्फी’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारदेखील आहे. इम्रानने अक्षयबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

‘सेल्फी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात इम्रानने अक्षयला ‘देवदूत’ म्हटले आहे कारण अक्षय कुमार ही पहिली व्यक्ती होती जिने इम्रानच्या मुलाला कर्करोग झाल्याचं कळताच त्याच्याशी संपर्क केला होता. इम्रानने २००६ साली परवीन शहानीबरोबर लग्न केले. २०१० साली ते पालक बनले. २०१४ साली त्यांच्या मुलाला अयानला कर्करोग झाल्याचे निदान झाले. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तो असं म्हणाला, “मी अक्षयला एक चाहता म्हणून फॉलो केले आहे. तो मला खूप आवडतो. मला गेल्या काही वर्षांत त्याला जाणून घेण्याचा बहुमान मिळाला आहे.”

१० दिवसांच्या चित्रीकरणाचे कार्तिक आर्यनने घेतले ‘इतके’ कोटी; म्हणाला, “मी निर्मात्यांचे पैसे…”

तो पुढे म्हणाला, “माझ्या मुलाच्या तब्येतीची समस्या असताना तो माझ्यासाठी तिथे होता. तो पहिला माणूस होता ज्याने मला फोन केला, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या पाठीशी तोउभा होता. तेव्हा मी त्याला नीट ओळखत नव्हतो. तुमच्या चांगल्या काळात तुमच्याबरोबर चांगले लोक असतात पण वाईट काळात वाईट काळात तुमच्याकडे येणारे देवदूत असतात. अक्षय त्यापैकी एक आहे.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ २४ फेब्रुवारीला ‘प्रदर्शित होणार आहे. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटि या अभिनेत्रीसुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याची निर्मिती करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून केलेली आहे. शिवाय राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे