आज इमरान हाश्मी हा त्याच्या हटके भूमिकांसाठी अन् उत्तम चित्रपटांच्या निवडीसाठी ओळखला जात असला तरी एकेकाळी तो ‘सिरियल किसर’ म्हणून अधिक लोकप्रिय होता. ‘फुटपाथ’ या चित्रपटापासून सुरुवात केलेल्या इमरानने नंतर ‘मर्डर’, ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’सारख्या चित्रपटातून स्वतःच्या सिरियल किसर या प्रतिमेला आणखी ग्लोरिफाय केलं. इमरानचा चित्रपट म्हणजे एखाद दूसरा हॉट किसिंग सीन असणारच असं गृहीत धरूनच मंडळी त्याचे चित्रपट पाहायला जायला लागली.

हळूहळू त्याने त्याची ही प्रतिमा बदलायला सुरुवात केली अन् हटके भूमिकांच निवड त्याने केली. या ‘सिरियल किसर’ प्रतिमेमुळे इमरानचे काही नुकसान झाले, तसेच त्याच्या पत्नीलाही यामुळे असुरक्षित वाटत असे याविषयी नुकतंच त्याने भाष्य केलं आहे. प्रेक्षकांच्या डोक्यात फिट्ट बसलेल्या ‘सिरियल किसर’ या प्रतिमेचा काही निर्मात्यांनी गैरफायदा घेतला असल्याचंही इमरानने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा : बॉक्स ऑफिसवर आपटलेला रजनीकांत यांचा ‘लाल सलाम’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इमरानने आता किसिंग सीन द्यायचं का थांबवलं? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना इमरान म्हणाला, “हा माझ्या पत्नीचा सल्ला आहे आणि मी तिचं ऐकतो. मी सध्या माझ्या चित्रपटात किसिंग सीन ठेवत नाही. खरंतर आधीपासूनच मला या अशा सीन्सवर आक्षेप घ्यायचा होता, पण माझी ‘सिरियल किसर’ ही प्रतिमा नकळत बनली अन् काही निर्मात्यांनी त्याचा गैरफायदाही घेतला. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी ती गोष्ट आवश्यक बनली. मी जेव्हा माझे काही चित्रपट पाहतो तेव्हा मला स्वतःला वाटतं की काही ठिकाणी त्या किसिंग सीनची अजिबात आवश्यकता नव्हती, पण प्रेक्षकांना तेच हवं होतं. मी खरंतर ते चित्रपटाखातर केलं पण शेवटी टीकेचा भडिमारही माझ्यावरच झाला.”

View this post on Instagram

A post shared by Emraan Hashmi (@therealemraan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इमरान नुकताच सलमान खानबरोबरच्या ‘टायगर ३’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकला. आता लवकरच तो ‘शोटाइम’ या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील झगमगाटामागील एक भयाण विश्व या सीरिजमधून दाखवण्यात येणार आहे. करण जोहर व अपूर्व मेहता यांनी या सीरिजची निर्मिती केली असून हा शो डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये इमरानबरोबरच मौनी रॉय, श्रीया सरन, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.