बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’मुळे बराच चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. शाहरुखचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अवघ्या दोन दिवसांवर हा चित्रपट येऊन ठेपला आहे. चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच मोठया प्रमाणावर कमाई झाली आहे. ‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख खान सोशल मीडियावरही त्याचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच त्याने ट्विटरवर चाहत्यांसाठी #AskSRK सेशन घेतलं होतं. ज्यात त्याने त्याच्या ‘जवान’ चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.

पठाणसाठी त्याचे चाहते पण उत्सुक आहेत. #AskSRK या सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्या मजेदार प्रश्नांची आपल्या शैलीत उत्तरं दिली आहेत. “‘पठाण’ चित्रपटाच्या बरोबरीने अनेक चित्रपटांचे ट्रेलर टीझर येत आहेत तर जवानचा पण ट्रेलर प्रदर्शित कर” असे एका चाहत्याने विचारले त्यावर शाहरुखने उत्तर दिले की “आमचा टीझर प्रेमाबरोबर येतो चित्रपटाबरोबर येत नाही! हाहा” असा रिप्लाय शाहरुखने दिला.

शाहरुखचा ‘पठाण’ सुपरहिट व्हावा यासाठी राखी सावंतने आईकडे मागितला आशीर्वाद; म्हणाली…

शाहरुखचे चाहते त्याच्या ‘जवान’ या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्याबरोबर दक्षिणात्य अभिनेत्री नयनताराही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचप्रमाणे विजय सेतुपतीदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. हा चित्रपट यावर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान जवळपास ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. आता ‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.