Farah Khan’s Reaction on Javed Jaaferi’s Stunning Home : बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान सध्या बरीच चर्चेत असते. ती तिच्या युट्यूब चॅनेलवर अनेक कलाकारांबरोबरचे व्हिडीओ पोस्ट करत असते. यासाठी ती स्वत: कलाकारांची भेट घेते. या व्हिडीओमध्ये अनेक कालाकर मंडळी विविध पदार्थ बनवताना दिसतात. अनेकदा कलाकार मंडळी व फराह बॉलीवूडमधील चित्रपटांच्या जुन्या आठवणी व कलाकारांबद्दल गप्पा मारत असतात. अशातच नुकतीच फराहने अभिनेते जावेद जाफरी यांना भेट दिली. यावेळी त्यांच्या सुंदर घराने फराहचं लक्ष वेधून घेतलं.

जावेद जाफरी यांच्या घरी गेल्यानंतर त्यांचं घर पाहताच फराह व तिचा स्वयंपाकी दिलीप कुमार चकित झाले. या दोघांना अभिनेत्याचं आलिशान घर प्रचंड आवडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पुढे फराहने जावेद यांचं संपूर्ण घर पाहिल्यानंतर गमतीत “जावेद तुझ्याशीच लग्न करायला पाहिजे होतं” असं म्हटलं आहे. पुढे जावेद यांनी तिला त्यांच्या घरातील बाल्कनीमधून दिसणारा बाहेरचा परिसर दाखवला. जावेद जाफरींच्या घराची मोठी बाल्कनी पाहून फराह खानने जावेद यांच्या घराचं भरभरून कौतुक केलं.

फराह खानच्या या व्हिडीओमध्ये जावेद जाफरी यांच्यासह त्यांचे भाऊ नावेद जाफरी उपस्थित होते व त्यांच्यासह त्यांचे एक मित्रही या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहेत. यावेळी तिघांनी चिकन चाप व चिकन बिस्कीट असे पदार्थ बनवले. यावेळी जावेद यांनी त्यांच्या ‘बूगी वूगी’ या गाजलेल्या डान्सशोच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, फराह खानबद्दल बोलायचं झालं तर फराहने शेवटचं दीपिका पदुकोण शाहरुख खान यांच्या २०१४ रोजी आलेल्या ‘हॅपी न्यू ईयर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यासह ती नृत्य दिग्दर्शिकाही आहे. नुकतंच तिने आमिर खानचा मुलगा जुनैद खान व खूशी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘लव्हयापा’ या चित्रपटातील गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या ती अनेक कलाकारांच्या भेटी घेत त्यांच्याशी चित्रपटसृष्टीतील अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारत असते. तर तिच्या या व्हिडीओला प्रेक्षकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो.