बॉलीवूडचा चॉकलेट बॉय कार्तिक आर्यन आपल्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतो. कार्तिकने गुजरातमधील गांधीनगर इथं २८ जानेवारी रोजी पार पडलेल्या ६९व्या फिल्मफेअर सोहळ्याला हजेरी लावली. पापाराझी आणि चाहत्यांना नेहमीच भेटायला उत्सुक असणारा कार्तिक आपल्या चाहत्यांना भेटायला त्यांच्याजवळ गेला असता अचानक इथं एक लहान अपघात झाला.

‘विरल भयानी’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकची एक झलक पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते जमले होते. चाहत्यांचा उत्साह पाहून कार्तिक हॅलो करत त्यांच्याजवळ गेला. बॅरिकेडच्या मागे गर्दी करून उभे असलेले चाहते कार्तिकला अभिवादन करण्यासाठी एकत्रित पुढे आले. या गोंधळात धक्काबुक्की झाली आणि बॅरिकेड तोडत चाहते एकमेकांवर पडले. कार्तिक दचकला आणि त्याने क्षणार्धातच त्याचे पाऊल मागे घेतले आणि सुरक्षा रक्षकांना झालेल्या घटनेनंतर काळजी घेण्यास सांगितली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा… ‘बिग बॉस १७’ तून कोट्यवधी कमावले, जाणून घ्या मुनव्वर फारुकीची एकूण संपत्ती अन् कार कलेक्शन

या व्हायरल पोस्टवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एकजण कमेंट करत म्हणाला, “भारतीय सुपरस्टारच्या सुरक्षेबाबत पहिल्यांदा अशी घटना झाली आहे. एवढी मोठी चूक व्हायला नको होती, कार्तिकची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे.” तर अनेकांनी चाहत्यांनी आपल्या आवडत्या स्टार्सला भेटताना स्वतःची काळजीही घ्यावी, असं म्हटलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६९ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात कार्तिकने दमदार परफॉर्मन्सही दिला. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याबद्दल सांगायचं झा्या यावर्षी कपूर कपलने म्हणजेच रणबीरने कपूर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर आलिया भट्टने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला. या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.