सनी देओल, अमीषा पटेल व उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. सहा दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाने तुफान कमाई करत अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आता चित्रपटाच्या सहाव्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.

प्रकाश आंबेडकरांनी केले राधिका आपटेच्या पात्राचे कौतुक; म्हणाले, “ज्या वंचित आणि बहुजनांनी…”

बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या रिपोर्टनुसार ‘गदर 2’ च्या कमाईत सहाव्या दिवशी ४० टक्क्यांनी घट झाली. या चित्रपटाने बुधवारी ३३.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चित्रपटाने पहिल्या दिवशी ४०.१ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी ४३.०८ कोटी, तर ५० कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली होती. अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने १३३.१८ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर उर्वरित तीन दिवसाची आकडेवारीही चांगली होती.

पंचपक्वांनांचं जेवण अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटात केळवण संपन्न, फोटो शेअर करत म्हणाली…

चौथ्या दिवशी कमाईत २५ टक्के घट झाली आणि चित्रपटाची कमाई ३८.७० कोटी रुपये झाली. मंगळवारी पाचव्या दिवशी स्वातंत्र्यदिन होता. यादिवशी चित्रपटाने ५५.५० कोटींचा व्यवसाय केला. तर, सहाव्या दिवशी ३३.५० कोटी कमावले. सहा दिवसांच्या एकूण कमाईचा आकडा २६२.४८ कोटी रुपये झाला आहे. हा यावर्षीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २२ वर्षांनंतर ‘गदर एक प्रेम कथा’चा सिक्वेल ‘गदर २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. तारा सिंग, सकिना व जीत यांच्याभोवती चित्रपटाची स्टोरी फिरते. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघता हा लवकरच ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.