बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज ५८वा वाढदिवस आहे. आमिरने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. प्रत्येक भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणं ही आमिरची खासियत. आमिर त्याच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. त्याचबरोबरीने त्याचं खासगी आयुष्यही कोणापासून लपून राहिलेलं नाही. किरण रावबरोबर घटस्फोट घेत असल्याची त्याने घोषणा केली. हे ऐकूनच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा – Video : स्वयंपाक घर, वॉर्डरोब, अन्…; फारच सुंदर आहे वनिता खरातचं घर; व्हिडीओमध्ये दाखवली झलक

‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर किरण राव आणि आमिरची लव्ह स्टोरी सुरु झाली. ‘लगान’च्या सेटवर ती पहिल्यांदा आमिर खानला भेटली. २००२ मध्ये आमिरने त्याची पहिली पत्नी रीनाला घटस्फोट दिला. त्यानंतर २००५मध्ये आमिर व किरणने लग्न केलं. पण किरण रावबरोबर घटस्फोट घेण्यामागचं कारण काय हे आमिरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

आमिर म्हणाला, “ती मला नेहमी म्हणायची की जेव्हा आम्ही एक कुटुंब म्हणून कोणत्या विषयावर बोलत असू तेव्हाही मी माझ्याच विश्वात रमलेला असे. मी एक वेगळा व्यक्ती आहे. त्यानंतर तिने मला हे देखील स्पष्ट केलं की मी बदलावं अशी तिची इच्छा अजिबात नाही. कारण मी जर बदललो तर तो व्यक्ती राहणार नाही ज्या व्यक्तीवर तिने प्रेम केलं होतं”.

आणखी वाचा – आईच्या निधनानंतर माधुरी दीक्षितची भावूक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “आज सकाळी उठले आणि…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “‘किरण आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करतो. आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा आणि आदर आहे. लोकांना आमच्या नात्याबाबत समजत नसेल. आम्हाला समजणं कठीण आहे. कारण जेव्हा एक विवाहित जोडपं वेगळं होतं तेव्हा त्यांच्यामध्ये असं नातं पाहायला मिळत नाही जे आज आमच्यात आहे. किरण आणि माझा घटस्फोट होण्याचं कारण दुसरं कोणतंही नातं नव्हतं. आमच्या घटस्फोटानंतर माझं फातिमा सना शेखशी अफेअर असल्याच्या अफवा सुरू झाल्या. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. माझं तेव्हाही कोणाशी अफेअर नव्हतं आणि आताही मी कोणत्याही व्यक्तीसह रिलेशनशिपमध्ये नाही”. आजाही आमिर व किरण एकमेकांना भेटतात.