बॉलिवूड अभिनेता वरूण धवनचा आज वाढदिवस आहे. तो आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते व बॉलिवूडमधील कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. वरुणच्या पत्नीचे नाव नताशा दलाल आहे. दोघांनी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती. आज वरुणच्या वाढदिवसानिमित्त त्याची व नताशाची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.

हेही वाचा – नीता अंबानींचे सौंदर्य फुलवणारा मेकअप आर्टिस्ट नक्की आहे तरी कोण? पगार ऐकून व्हाल अवाक्

करीनाच्या चॅट शो ‘वॉट वुमन वॉन्ट’मध्ये पाहुणा म्हणून वरूण आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या आणि नताशाच्या रिलेशनशिपबद्दल आणि त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली, याबद्दल माहिती दिली होती. “मी सहावीत असताना नताशाला भेटलो होतो. तेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. अकरावी किंवा बारावीपर्यंत आम्ही चांगले मित्र होतो. पण मला आठवतंय की जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा आम्ही मॅनेकेजी कूपर या शाळेत होतो. ती यलो हाऊस आणि मी रेड हाऊसमध्ये होतो. आम्ही बास्केटबॉलच्या कोर्टमध्ये होतो आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली की ते आम्हाला स्नॅक्स द्यायचे. अजुनही मला ती समोरुन येताना आठवते. मी तिला पाहिले आणि मला असे वाटले की मी तिच्या प्रेमात पडलो. तिने मला तीन ते चार वेळा नकार दिला होत. पण मी आशा सोडली नाही,” असं वरूण म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरुण व नताशा यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. लहानपणीचे मित्र असलेले वरुण व नताशा अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं.