ईशा देओल बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर ईशाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सध्या ईशा अभिनयापासून लांब असली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते. अभिनयाव्यतिरिक्त ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर ईशा पती भरत तख्तानीबरोबर घटस्फोट घेणार आहे. तिने प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ती पतीपासून परस्पर संमतीने विभक्त होत आहे. ईशाने सांगितले की, तिने मुलांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. ईशाच्या या निर्णयावर हेमा मालिनी यांची काय प्रतिक्रिया आहे याबाबत अनेकजण प्रश्न विचारत आहेत. आता लेक ईशा व भरत तख्तानीच्या घटस्फोटावर हेमा मलिनींची भूमिका काय आहे, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भरत तख्तानीबरोबर घटस्फोट घेण्याच्या ईशाच्या निर्णयानंतर हेमा मालिनी लेकीच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या आहेत. अद्याप त्यांनी या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नसले तरी ईशाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करणार नसल्याचे त्यांनी स्प्ष्ट केले आहे.

हेही वाचा- रकुल-जॅकी गोव्यातील ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये बांधणार लग्नगाठ; एका रात्रीचे भाडे तब्बल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी बिझनेसमन भरत तख्तानीशी लग्नगाठ बांधली. ईशा व भरत यांना राध्या व मिराया नावाच्या दोन मुली आहेत. अनेकदा ईशा आपला पती व मुलींबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघे एकत्र दिसले नाहीत. तसेच गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हेमा मालिनी यांच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत कुटुंबातील जवळपास सर्वच सदस्य सहभागी झाले होते पण या पार्टीत ईशाचा पती भरत तख्तानी दिसला नाही. त्यामुळे ईशा व भरत यांच्यात काहीतरी बिनसल्याची चर्चांना उधाण आले होते.