करण जोहर दिग्दर्शित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ प्रदर्शित होऊन एक महिना झाला आहे. या चित्रपटात धर्मेंद्र व शबाना यांचा एक किसिंग सीन आहे. या किसिंग सीनची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनीं यांनी या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली होती. आता हेमा मालिनींनी पती धर्मेंद्र यांच्यासारख पडद्यावर किसिंग सीन करणार का याबाबत खुलासा केला आहे.
हेही वाचा- ‘ड्रीम गर्ल २’ पुढे ‘गदर २’ची जादू फिकी, आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…
‘इंडिया डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यासारखे ऑनस्क्रीन किसिंग सीन करणे तुम्हाला सोईचे आहे का असा प्रश्न हेमा मालिनी यांना विचारण्यात आला होता. तेव्हा उत्तर देताना हेमा मालिनी म्हणाल्या, “का नाही, नक्कीच करेन. जर ते चांगले असेल आणि चित्रपटाशी संबंधित असेल तर कदाचित मी असं करु शकते.”
काही दिवसांपूर्वीच हेमा मालिनी यांनी चित्रपटात धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली होती, त्या म्हणालेल्या, “धरमजी आणि शबाना आझमी यांचा किसिंग सीन मी अजुन पाहिलेला नाही. लोकांना हा चित्रपट आवडेल याची मला खात्री आहे. मी धरमजींसाठी खूप आनंदी आहे कारण त्यांना नेहमी कॅमेरासमोर राहणं आवडतं.”
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाच्या कमाईबाबत बोलायच झालं तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका आहेत. तसेच जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेद्र यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.