सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आता अभिनेत्री हेमा मालिनी यांनी ‘गदर २’ च्या यशावर भाष्य केलं आहे. तसेच त्या सनी देओलला नेहमी कोणता सल्ला देतात याबाबतही खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘गदर २’ च्या यशानंतर सनी देओलने मानधनात केली तब्बल ‘एवढी’ वाढ? अभिनेत्याचे ट्वीट व्हायरल

एका मुलाखतीत हेमा मालिनी यांनी ‘गदर २’ च्या यशाबद्दल भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, ‘गदर २’ हे मोठे यश आहे कारण लोकांना सनी खूप आवडतो. अनेकांना तो हवा असतो. मी त्याला नेहमी म्हणायचे की, “आता तुला आता सगळ्यात चांगलं काम करायचं आहे आणि तुला करावच लागेल. सगळ्यांना माहित आहे की तो खूप गोड आहे आणि मी त्याच्या प्रत्येक सीनबद्दल खूप उत्सुक आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन छान होता”.

याआधी हेमा मालिनी यांची मुलगी ईशा आणि आहानाही सनी देओलला सपोर्ट करण्यासाठी ‘गदर २ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या. इशा आणि अहाना सनी देओल आणि बॉबी देओलसोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. याबद्दल बोलताना हेमा म्हणाल्या होत्या, “आम्ही सोबत आहोत, नेहमी एकत्र आहोत. आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो, कोणतीही अडचण आली तरी आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो.”

हेही वाचा- Video राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर क्रिती सेनॉन कुटुंबासह पोहचली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, वाटली मिठाई

याआधी हेमा मालिनी यांची मुलगी ईशा आणि आहानाही सनी देओलला सपोर्ट करण्यासाठी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचल्या होत्या. इशा आणि अहाना सनी देओल आणि बॉबी देओलसोबत सार्वजनिक कार्यक्रमात दिसण्याची ही पहिलीच वेळ होती. याबद्दल बोलताना हेमा म्हणाली, “आम्ही सोबत आहोत, नेहमी एकत्र आहोत. आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो, कोणतीही अडचण आली तरी आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. त्यामुळे यावेळी प्रेसला ते मिळाले आणि ते चांगले आहे.” देखील आनंदी.’