हेमांगी कवी ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हेमांगी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा ती इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून बिनधास्तपणे आपलं मांडताना दिसते. आज बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असल्याने अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “कतरिनाने बिकिनी घातलेली चालते पण, सईने घातली तर…”, मराठी अभिनेत्रीने मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “प्रेक्षकांना…”

हेमांगी कवीने अमिताभ बच्चन यांच्यासह सेटवरचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमांगी कवी आणि बिग बी यांची नुकतीच एका जाहिरातीच्या सेटवर भेट झाली होती. एका जाहिरातीच्या माध्यमातून अभिनेत्रीला बॉलीवूडच्या महानायकासह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे.

हेही वाचा : ‘अमिताभ’ नावाचं वलय

जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडीओ शेअर करत हेमांगीने अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “क्या कहूँ की खुशी, आश्चर्य, घबराहट, shock, respect से है लब सिले हुए! जिथे शब्द संपतात… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अमिताभ बच्चन सर” असं कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचा परखड प्रश्न, “कश्मीर फाईल्सच्या निर्मात्यांनी ४०० कोटी कमवले, काश्मिरी पंडितांना..?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमांगी कवीने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने अभिनेत्रीला “कसलं शूट होतं?”, असा प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये विचारला होता यावर हेमांगीने “जाहिरात…” असं उत्तर दिलं आहे. तसेच बिग बींबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता याबद्दल सविस्तर पोस्ट शेअर करेन असंही अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.