बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने ४ वर्षांनी ‘पठाण’ या चित्रपटातून पदार्पण केलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतिहास रचला. हा चित्रपट एवढा सुपरहीट होण्यामागील आणखी एक कारण म्हणजे सलमान आणि शाहरुख या दोन सुपरस्टार्सचं एका चित्रपटात दिसणं. ‘पठाण’मधील सलमान खानचा कॅमिओ चांगलाच गाजला. खूप वर्षांनी प्रेक्षकांनी त्यांचे २ लाडके सुपरस्टार्स मोठ्या पडद्यावर एकत्र अॅक्शन करताना पाहिले.

आता मात्र शाहरुख आणि सलमान हे दोघे‘टायगर वर्सेज पठाण’ या आगामी प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटात शाहरुख आणि सलमान आमने सामने येणार आहेत. या चित्रपटाची तयारी सुरू झाली असून यासाठी जबरदस्त पैसा खर्च केला जाणार असल्याचं म्हंटलं जात आहे. या चित्रपटासाठी आदित्य चोप्रा आणि त्यांच्या यश राज फिल्म्सनी तब्बल ३०० कोटीचं बजेट दिलं असल्याचं नुकतंच समोर आलं आहे.

आणखी वाचा : जेव्हा सासऱ्यांच्या बेताल वक्तव्यामुळे आयशा टाकियाला मान खाली घालावी लागली; अभिनेत्रीने मागितलेली जाहीर माफी

आता काही मीडिया रीपोर्टनुसार ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील जेसन मामोआ या चित्रपटात खलनायक म्हणून झळकणार असल्याचं म्हंटलं जात आहे. इतकंच नव्हे तर हे दोन्ही चित्रपट यश राज स्पाय युनिव्हर्सशी जोडलेले असल्या कारणाने अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफसुद्धा यात मुख्य भूमिकांमध्ये दिसू शकतात. या दोघीसुद्धा सलमान शाहरुखप्रमाणे एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : व्हिडिओ काढणाऱ्या चाहत्यावर नयनतारा भडकली; अभिनेत्रीने दिली फोन तोडायची धमकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृतिक रोशनच्या ‘वॉर २’चं शूटिंग पूर्ण झाल्यावर यश राज स्पाय युनिव्हर्सचा हा सर्वात मोठ्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. यश राज फिल्म्सचा हा आजवरचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचं म्हंटलं जात आहे. सलमान आणि शाहरुखचे चाहते यासाठी चांगलेच उत्सुक आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’ ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. सलमान खानचा याच युनिव्हर्समधील ‘टायगर ३’सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.