Housefull 5 Box Office Collection Day 13: तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट ६ जून २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हाऊसफुल’ या गाजलेल्या फ्रेंचायझीचा हा पाचवा भाग आहे.
‘हाऊसफुल ५’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त, नर्गिस फाखरी, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे, सौंदर्या शर्मा यांच्यासह आणखी काही कलाकार या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
‘हाऊसफुल ५’ ने १३ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर केली किती कोटींची कमाई?
आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊयात. ‘हाऊसफुल ५’ने पहिल्याच दिवशी २४ कोटींची कमाई केली होती. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल ५ ने १२७.२५ कोटींची कमाई केली होती. ‘सॅल्कनिक’नुसार १३ व्या दिवशी चित्रपटाने तीन कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे, त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाने एकूण १६५.२५ कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे.
या चित्रपटात सर्वच कलाकार वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, अक्षय कुमार अशा सर्वच कलाकारांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉफ ठरत होते. ज्यामध्ये ‘सरफिरा’, ‘अतरंगी रे’, ‘कटपुतली’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, ‘केसरी चाप्टर २’, ‘सिंघम अगेन’, ‘स्काय फोर्स’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसत आहे. तसेच रितेश देशमुखदेखील नुकताच ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अजय देवगण महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. आता हे कलाकार आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
आता २० जूनला आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक अनेक काळ प्रतीक्षा करत होते. चित्रपटाच्या ट्रेलरलादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुखदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे ‘तारे जमीन पर’प्रमाणेच हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ‘सितारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे ‘हाऊसफुल ५’ च्या कमाईवर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ आणखी किती कमाई करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.