Housefull 5 Box Office Collection Day 3: ‘हाऊसफुल 5’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (६ जून रोजी) प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने वीकेंडला जबरदस्त कमाई केली आहे. ‘हाऊसफुल 5’ने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांत किती गल्ला जमवला? ते पाहुयात.

कलाकारांची मांदियाळी असलेल्या ‘हाऊसफुल 5’ चे बजेट तब्बल २५० कोटी रुपये आहे. निर्मात्यांनी चित्रटपटात बॉलीवूडमधील अनेक आघाडीचे कलाकार घेतले आहेत आणि निर्मितीसाठी प्रचंड पैसा खर्च केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता तीन दिवसांची कमाीची आकडेवारी पाहता चित्रपटाला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळाला, तर तो लवकरच बजेटची रक्कम वसूल करेल, असं दिसतंय.

Housefull 5 चे तीन दिवसांचे कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हाऊसफुल 5’ ने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २४ कोटी रुपयांची कमाई करून दमदार ओपनिंग केली. त्यानंतर शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी ‘हाऊसफुल 5’ ने ३१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आधीच्या दोन्ही दिवसांपेक्षा तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने जास्त कमाई केली आहे. रविवारी चित्रपटाने ३२ कोटी रुपये कमावले. ‘हाऊसफुल 5’ चे तीन दिवसांचे कलेक्शन आता ८७ कोटी रुपये झाले आहे.

अक्षय कुमारचं फ्लॉपचं ग्रहण संपणार?

मागील काही वर्षे अक्षय कुमारसाठी चांगली राहिली नाहीत, कारण ५-६ वर्षांत आलेले त्याचे जवळपास सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले. पण २०२५ मध्ये ही परिस्थिती बदलेल असं दिसतंय. ‘हाऊसफुल 5’ ला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याच्या फ्लॉपचं ग्रहण संपेल, अशी चिन्हे आहेत. अक्षयचा २०२५ मधील हा तिसरा चित्रपट आहे. याआधी रिलीज झालेल्या ‘केसरी चॅप्टर २’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यापूर्वी ‘स्काय फोर्स’ने सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते, पण नंतर मात्र प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली होती.

आता ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित झाल्यावर त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता अक्षयचा हा चित्रपट बजेटची रक्कम वसूल करेल असं दिसतंय. अक्षयच्या ‘केसरी चॅप्टर २’ पेक्षा ‘हाऊसफुल ५’चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई जास्त होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हाऊसफुल 5’ मध्ये कलाकारांची मांदियाळी

‘हाऊसफुल 5’ मध्ये अक्षय कुमारबरोबर अभिषेक बच्चन, फरदीन खान, रितेश देशमुख, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रणजीत, जॅकलिन फर्नांडिस, चंकी पांडे, डिनो मोरिया आणि सौंदर्या शर्मा हे कलाकार आहेत. हा चित्रपट ए व बी अशा दोन व्हर्जनमध्ये प्रदर्शित झाला आहे.