Housefull 5 Teaser Release: काही दिवसांपासून एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित आहेत. त्यामध्ये जाट, ग्राउंड झिरो, केसरी २ अशा चित्रपटांचा समावेश आहे. या सगळ्यात आता प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते, त्या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

हाऊसफुल ५ या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून, तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या टीझरला नुकतेच सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ‘UA 16+’ रेटिंग दिले आहे.

‘हाऊसफुल ५ ‘चा धमाकेदार टीझर

आता या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरच्या सुरुवातीला अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांचे वेगवेगळे हावभाव दिसत आहेत. तसेच, नाना पाटेकरांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये पुढे एक खून होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता कोणाचा खून होणार, त्यामुळे काय परिस्थिती निर्माण होणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

तसेच, कोणते कलाकार कोणत्या भूमिकात दिसणार आणि ते एकत्र कसे येणार, हे पाहण्याचीदेखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. याआधी हाऊसफुल फ्रँचायझीचे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. चारही चित्रपटांनी धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले. त्यामुळे ‘हाऊसफुल ५’ची गोष्ट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

रितेश देशमुखने सोशल मीडियावर हा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करताना त्याने लिहिले, “आजच्या दिवशी १५ वर्षांपूर्वी वेडेपणा सुरू झाला होता. भारतातील सर्वांत मोठी फ्रँचायजी पाचव्या भागासह परतली आहे. यावेळी फक्त गोंधळ आणि कॉमेडी नाही, तर किलर कॉमेडी पाहायला मिळणार आहे.

‘हाऊसफुल ५’मध्ये अभिषेक बच्चन , रितेश देशमुख, संजय दत्त, फरदीन खान, जॅकलिन फर्नांडिस, नर्गीस फाखरी, डिनो मोरिया, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, श्रेयस तळपदे, जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार आहेत. तसेच, चित्रांगदा सिंग, सौंदर्या शर्मा, रणजित आणि आकाशदीप साबीर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दरम्यान, हा चित्रपट ६ जून २०२५ ला प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच, चित्रपटगृहांत प्रदर्शित झाल्यानंतर हाऊसफुल ५ हा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार नुकताच ‘केसरी २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर, रितेश देशमुख लवरकरच ‘रेड २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो अजय देवगणसह प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता ‘हाऊसफुल ५’मध्ये अनेक लोकप्रिय कलाकार एकत्र दिसणार आहेत. टीझरमध्ये त्यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. त्यामुळे ते चित्रपटात काय धमाल करणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे.