बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन खान बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याचं नाव पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर जोडलं जात आहे.

आर्यन खान व पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दुबईतील एका पार्टीदरम्यानचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आर्यन व सादियाच्या या फोटोंमुळे ते डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आर्यन खानला डेट करत असल्याच्या चर्चांवर अभिनेत्री सादिया खानने मौन सोडलं आहे.

हेही वाचा>> “तू पुरुष आहेस का?”, ‘बिग बॉस’च्या घरात फराह खानचा साजिदला सवाल

हेही वाचा>> ‘RRR’ला सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाण्यासाठी पुरस्कार मिळाला, पण…

‘सिटी टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सादिया म्हणाली, “पूर्ण माहिती ठाऊक नसताना माझ्या व आर्यनबद्दल अशी खोटी माहिती पसरवणं चुकीचं आहे. या गोष्टींना मर्यादा असल्या पाहिजेत. आर्यन हा एक चांगला व सभ्य मुलगा आहे, असं मी म्हणाले होते. पण म्हणून आम्ही डेट करत आहोत असा त्याचा अर्थ होत नाही”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा>> चार दिवस व्हेंटिलेटरवर होती ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री; पोस्ट शेअर करत म्हणाली…

“माझ्या व्यतिरिक्त इतरही लोकांना त्याच्याबरोबर फोटो क्लिक केले आहेत. पण या सगळ्यांमध्ये माझेच फोटो व्हायरल होत आहेत. आर्यन हा खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्यामुळे आमच्याबाबत या अफवा पसरवणं बंद करा”, असंही सादिया पुढे म्हणाली. त्यामुळे आर्यन खान व पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.