मे २०२१ मध्ये कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया २’ प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने तगडी कमाई केली. चित्रपटामधील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्याच्यामुळेच हा चित्रपट चालला असेही लोक म्हणत होते. ‘भूल भुलैया २’ ला मिळालेल्या यशामुळे त्याला बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स समोरुन येऊ लागल्या. तो सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या कामासाठी गुजरातमध्ये वास्तव्याला आहे.

यंदाची दिवाळी सर्वांसाठी खूप खास होती. करोनाच्या कठीण २ वर्षांनंतर सर्वजण मिळून दिवाळी साजरी करणार होते. या वर्षी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी दिवाळी निमित्त शानदार पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. अशाच एका पार्टीमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे एकत्र नाचताना दिसले. यावरुन ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशातच दिवाळी पार्टीमध्ये एकत्र दिसलेले कार्तिक आर्यन आणि पश्मिना रोशन यांच्या अफेअरबद्दल लोक बोलत आहेत. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, दिवाळीमध्ये कार्तिक-पश्मिना त्याच्या नव्याकोऱ्या मॅक्लेरन कारमधून बाहेर फिरायला गेले होते. जिओ वर्ल्ड ड्राईव्हवर ते लपूनछपून रात्री भेटतात.

आणखी वाचा – ‘हर हर महादेव’बद्दल नेमका आक्षेप काय? आव्हाड म्हणाले, “बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले हे कुठे…”

‘जेव्हा कार्तिक काहीच काम करत नसतो, तेव्हा तो पश्मिनाच्या घरी तिला भेटायला जातो. काही वेळेस ती कार्तिकची भेट घेण्यासाठी त्याच्या घरी जाते. ते गपचुप भेटले आहेत हे लोकांना कळू नये म्हणून ते आपापल्या गाड्या घरी पाठवून देतात, जेणेकरुन कोणाला त्यांच्यावर संशय येणार नाही’ असे कार्तिकच्या जवळच्या व्यक्तीने सांगितल्याचे पिंकव्हिलाच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. पश्मिना रोशन ही हृतिकचे काका राजेश रोशन यांची मुलगी आहे. शाहिद कपूरच्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटाच्या सिक्वेलद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा – ‘दिल्ली फाइल्स’आधी विवेक अग्निहोत्री हाताळणार ‘हा’ विषय; नाना पाटेकर, पल्लवी जोशी दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लव आज कल’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना कार्तिक आणि सारा अली खान यांच्यामध्ये जवळीक वाढली होती. ते रिलेशनशीपमध्येही होते. पुढे काही कारणांमुळे या नात्यांचा शेवट झाला अशीही चर्चा होती. त्याचे नाव अन्यना पांडेशी देखील जोडण्यात आले होते. त्यांनी ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते.