अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. याचे कारण तिचे चित्रपट नसून सुकेश चंद्रशेखरचा २०० कोटींचा घोटाळा हे आहे. या प्रकरणार जॅकलिनचेही नाव आले होते. जॅकलिन आणि सुकेशचे काही फोटो व्हायरल झाल्याने ते रिलेशनशिपमध्ये असल्याचीही चर्चा रंगली होती. जॅकलिनने त्याच्याकडून महागड्या, वस्तू घेतल्याचा आरोप ईडीच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. त्यामुळे दिल्ली पोलीस, ईडी यांच्याकडून जॅकलिनची चौकशीही करण्यात आली. पण आता जॅकलिनचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : सुपरस्टार विजय सेतुपतीही ‘हर हर महादेव’च्या प्रेमात, ट्वीट करत म्हणाला, “मला या चित्रपटाचा…”

३० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जॅकलिन आणि गौरी खान एकमेकींशी गप्पा मारत आहेत. त्यात गौरी खान जॅकलिनच्या आवडीनिवडी जाणून घेताना दिसतेय. तसेच जॅकलिनच्या एका बेडरुमची झलकही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. जॅकलिनच्या बेडरूमचे इंटीरिअर पाहून गौरी खूप खुश झालेली पाहायला मिळत आहे. गौरी खानच्या ‘ड्रीम होम’ या शोच्या नव्या भागात जॅकलिन सहभागी झाली होती, त्याचा हा प्रोमो आहे.

या व्हिडीओत जॅकलिन गौरी खानशी तिच्या नव्या घराच्या डिझाइनबाबत चर्चा करताना दिसत आहे. त्यामुळे आता जॅकलिन गौरी खानककडून तिचं घर डिझाइन करून घेत आहे, हे स्पष्ट झालं आहे. याआधी गौरी खानने मनिष मल्होत्रा, कबीर खान यांचीही घरं डिझाइन केली आहेत. त्यानंतर आता गौरी जॅकलिनचे घर डिझाइन करत आहे हे कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या.

हेही वाचा : २०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी जॅकलीन फर्नांडिसला अंतरिम जामीन मंजूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल झालेल्या या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत जॅकलिनला टोमणे मारले आहेत. एका नेटकऱ्याने “याचे पैसे सुकेशने दिले आहेत का?” असे कमेंट करत विचारले आहे. तो दुसरीकडे जॅकलिनच्या चाहत्यांनी ती नव्या रुपात समोर येत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.