दिवंगत श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची लाडकी लेक व लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी कपूर मागच्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवीने ‘कॉफी विथ करण’ च्या आठव्या पर्वात बहीण खुशीबरोबर हजेरी लावली होती. या शोमध्ये तिने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला. तिने शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं या शोमध्ये सांगितलं होतं.

शिखरबरोबरचं नातं जाहीर केल्यावर जान्हवी अनेकदा त्याच्यासोबत देवदर्शनाला जाताना दिसते. जान्हवी व शिखर दोन-तीनवेळा एकत्र तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. एकवेळा तर जान्हवी गुडघ्यांवर चालत मंदिरात गेली होती. त्यानंतर आता तिचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ती अनवाणी पायांनी चालत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाताना दिसतेय.

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची लेक होणार जान्हवी कपूरची सासू? शिखर पहारियाच्या आईचं मराठी मालिकाविश्वाशी आहे खास कनेक्शन

जान्हवी कपूर वांद्रे इथून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत अनवाणी पायाने चालत गेली. तिच्याबरोबर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाची आई स्मृती पहारियादेखील होत्या. दोघीही अनवाणी चालत बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटे मंदिरात पोहोचल्या. यावेळी त्यांच्याबरोबर सुरक्षा रक्षक होते. स्मृती पहारिया या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे त्यांची धाकटी बहीण आहे.

Video: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करतेय जान्हवी कपूर, प्रेमाची कबुली दिल्यानंतर शिखरसह पोहोचली देवदर्शनाला

जान्हवी कपूर व स्मृती पहारिया दोघींचेही चालत जातानाचे व्हिडीओ विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती नुकतीच शाहिद कपूर व क्रिती सेनॉन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘तेरी बातों मे ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसली. याशिवाय ती सध्या राम चरणबरोबर एका दाक्षिणात्य चित्रपटाचं शूटिंग करत आहे.