आमिर खानची लेक आयरा खान व नुपूर शेखरच्या लग्नाची काल, १३ जानेवारीला ग्रँड रिसेप्शन पार्टी पार पडली. या पार्टीला बॉलीवूड, मराठी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज ठाकरे, आदित्य ठाकरे असे बरेच नेतेमंडळी देखील या पार्टीत उपस्थित राहिली होते. सध्या आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीतले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. या पार्टीत ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर भडकलेल्या दिसल्या.

अभिनेत्री जया बच्चन यांचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये जया बच्चन यांच्यासह त्यांची लेक श्वेता नंदा आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसत आहे. जेव्हा जया श्वेता, सोनालीबरोबर पार्टीत प्रवेश करतात तेव्हा पापाराझी त्यांना फर्स्ट वन वगैरे सांगतात. हे ऐकून जया बच्चन भडकतात आणि म्हणतात, “मला नका सांगू पहिलं आणि दुसरं.” जया बच्चन यांच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Video: आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीला सावत्र आई किरण राव गैरहजर, आमिर खान कारण सांगत म्हणाला…

हेही वाचा – Video: आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत प्रसिद्ध अभिनेत्रीचा पतीबरोबर रोमँटिक अंदाज, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जया बच्चनचा यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांना पुन्हा नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिल आहे, “हिला महत्त्व देणं थांबवा.”, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिल आहे, “बच्चन कुटुंब नेहमी टेन्शनमध्येच असतं.”, तसेच तिसऱ्याने लिहिल आहे, “ही नेहमी असा अॅटिट्यूड का दाखवते?,” चौथ्या नेटकऱ्याने लिहिल, “या म्हातारीला भाव देऊ नका.”

दरम्यान, आयरा-नुपूरच्या लग्नाच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडच्या सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, हेमा मालिका, रेखापासून ते सलमान खान, शाहरुख खान, अनिल कपूर अशा अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.