भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित ‘द डिप्लोमॅट’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम (John Abraham) प्रमुख भूमिकेत आहे. सादिया, प्राप्ती शुक्ला, जगजित संधू, कुमुद मिश्रा, राम गोपाल बजाज हे कलाकार इतर प्रमुख भूमिकांत दिसत आहेत. १४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, आता पाच दिवसांनंतर या चित्रपटाने किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

पाचव्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

शिवम नायर दिग्दर्शित द डिप्लोमॅट या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात १३.३० कोटींची कमाई केली. मात्र, सोमवारपासून या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील कमाईत घट झाल्याचे दिसत आहे. सॅल्कनिकनुसार, सोमवारी चित्रपटाच्या कमाईत ६७.४७ टक्क्यांची घट झाली होती. मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी या चित्रपटाने केवळ १. ४७ कोटींची कमाई केली आहे. पाच दिवसांत चित्रपटाने भारतात १६.२ कोटींची कमाई केली. जॉन अब्राहमचा याआधीचा चित्रपट वेदाबरोबर द डिप्लोमॅटची तुलना केली असता, द डिप्लोमॅटची कमाई जास्त असल्याचे पाहायला मिळते. वेदाने पाच दिवसांत १५.५ कोटींची कमाई केली होती. द डिप्लोमॅटने संपूर्ण जगभरात २१ कोटींची कमाई केली आहे.

सॅल्कनिकनुसार, या चित्रपटाला हिंदी भाषिक प्रदेशात केवळ ८.४६ टक्के प्रतिसाद मिळाला. मंगळवारी संपूर्ण भारतात २,६५७ शो झाले. त्यापैकी २२ चेन्नईमध्ये होते, त्याला २२ टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. पुण्यातील १८१ शोला १२.२५ टक्के, जयपूरमध्ये ८२ शो होते, त्याला ११.७५ टक्के प्रतिसाद मिळाला. मुंबईमध्ये ४६९ शो होते, त्याला १० टक्के प्रतिसाद मिळाला. तर दिल्ली एनसीआर मध्ये ७३९ शो होते, त्याला ७.७५ टक्के प्रतिसाद मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॉन अब्राहमचा हा चित्रपट आणखी किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जॉन अब्राहम अभिनेता जॉन अब्राहम हा त्याच्या अ‍ॅक्शन फिल्मसाठी ओळखला जातो. ‘धूम’, ‘रेस २’, ‘जिंदा’ अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेता ओळखला जातो. तसेच ‘सत्यमेव जयते २’, ‘वो भी दिन थे’, ‘पठाण’ या चित्रपटांतील जॉन अब्राहमच्या भूमिकेचे कौतुक झाले. आता अभिनेता त्याच्या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे. द डिप्लोमॅटमधील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.