बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. तिचे हे सर्व फोटो चर्चेचा विषय ठरताना दिसतात. अनेकदा तिला तिच्या फोटोंमुळे, तिने केलेल्या पोस्ट्समुळे ट्रोल केलं जातं. आता यावर काजोलने मौन सोडलं आहे.

काही दिवसांपूर्वी न्यासाचा बदललेला लूक प्रेक्षकांसमोर आला होता. तो लूक पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आता काजोलने तिच्या लेकीला ट्रोल केलं जाण्यावर तिचं मत मांडलं आहे. लेकीला ट्रोल केल्यानंतर काजोलला दुःख होतं, पण ट्रोलिंग आता सोशल मीडियाचा एक भाग बनला आहे, असं तिचं मत आहे.

आणखी वाचा : “एवढी सोन्यासारखी बायको असताना…” विकी कौशल आणि कियारा आडवाणीचा बाथटबमधील रोमान्स पाहून नेटकऱ्यांचा संताप

काजोल सध्या तिच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने ती सध्या अनेक मुलाखती देत आहे. दरम्यान नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीत तिला न्यासाला ट्रोल केलं जाण्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, ” ट्रोलिंग हा आता सोशल मीडियाचा एक भाग झाला आहे. लोक तुम्हाला ट्रोल करतात म्हणजेच त्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे असा याचा अर्थ होतो. लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं म्हणजे तुम्ही प्रसिद्ध आहात. जर लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं नाही तर याचा अर्थ त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही.”

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, “न्यासाला जर कोणी ट्रोल केलं तर मला नक्कीच त्याचं वाईट वाटतं. तिच्यावर केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर आतापर्यंत जितक्या बातम्या आल्या आहेत, त्या सगळ्या मी वाचल्या आहेत. शंभर पैकी दोन लोक तिला ट्रोल करतात आणि फक्त त्याच दोन कमेंट्सना हायलाईट केलं जातं. पण या सगळ्याची सकारात्मक बाजू बघायची असं मी तिला नेहमी सांगत असते.”

हेही वाचा : Video: काजोलबरोबर रोमान्स करणाऱ्या मराठमोळ्या गश्मीर महाजनीची सर्वत्र चर्चा; नेटकरी म्हणाले, “शाहरुखपेक्षा…”

न्यासा ही लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.