अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच तिची बेधडक वृत्ती आणि स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. समाजातील तिला न आवडणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ती बिनधास्तपणे सोशल मीडियावरून तिची मतं मांडत असते. तिच्या याच स्पष्टवक्तेपणामुळे मध्यंतरी तिचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं होतं. मात्र आता तिला ते परत मिळालं आहे.

कंगना रणौतला नुकतंच तिचं ट्विटर अकाउंट परत मिळालं. तिचं जुनंच अकाउंट आता रिस्टोर करण्यात आलं आहे. त्यामुळे मोठ्या गॅपनंतर ती ट्विटरवर परतली आहे. हे अकाउंट परत मिळाल्या मिळाल्या लगेच तिने एक ट्वीट करत त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : ‘इमर्जन्सी’ चित्रपट बनवण्यासाठी कंगना रणौतने गहाण ठेवली तिची संपूर्ण मालमत्ता, म्हणाली, “माझ्या मालकीची…”

या अकाउंटवरून कंगनाने एक ट्वीट केलं. तिने लिहिलं, “सर्वांना नमस्कार, इथे परत आल्याचा मला आनंद झाला.” हे ट्वीट कंगनाच्या टीमच्या वतीने करण्यात आलं आहे. आता या ट्वीटवर कमेंट्स करत तिच्या चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रिटींनी देखील तिचं स्वागत केलं आहे.

हेही वाचा : “गोमांस आणि इतर मांस खाण्यात…” कंगना रणौतचे ट्वीट व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही वर्षांपासून ती या माध्यमावर फार सक्रिय होती. पण मे २०२१ मध्ये कंगना रणौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं. ट्विटर कंपनीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याने तिच्यावर ही कारवाई झाली होती. ट्विटरद्वारे ती वेगवेगळ्या विषयांवर सतत व्यक्त व्हायची. कंपनीद्वारे अकाऊंटवर निर्बंध आल्यामुळे तिने अन्य सोशल मीडिया साईट्सचा आधार घेतला. तर आता पुन्हा एकदा ती ट्विटरवर परतली आहे.