कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या विनोदी शैलीसाठी खूप लोकप्रिय आहे. ‘द कपिल शर्मा शो’ने त्याला वेगळी ओळख दिली. तर आता नुकताच तो ‘झ्विगाटो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परवाच हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे.

कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. या चित्रपटात कपिलने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नंदिता दासने केलं असून कपिल शर्माच्याबरोबरीने गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही दाखवण्यात आला. पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यास अयशस्वी ठरलेला दिसला. दुसऱ्या दिवशीही हेच चित्र पहायला मिळालं आहे.

आणखी वाचा : एका एपिसोडसाठी ५० लाख फी आकारणाऱ्या कपिल शर्माची एकूण संपत्ती किती? स्वतःच खुलासा करत म्हणाला, “माझ्याकडे…”

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्यानुसार या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त ४३ लाख कमावले. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल या चित्रपटाच्या कमाईत ४४.०९ टक्क्यांनी वाढ झाली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६२ लाखांचा गल्ला जमवला. तर या चित्रपटाचे दोन दिवसाचे एकूण कमाई १.०५ कोटी आहे.

हेही वाचा : “‘द कपिल शर्मा शो म्हणजे…” प्रसिद्ध निर्मात्याची कार्यक्रमावर टीका, शाहरुख खानच्या नावाचाही उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या मानाने दुसऱ्या दिवशीच्या कमाईमध्ये वाढ झालेली दिसली. त्यामुळे या चित्रपटाला प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज आणखीन चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.