करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. २८ जुलै रोजी रिलीज झालेला हा चित्रपट ‘गदर २’ आणि ‘ओएमजी 2’च्या शर्यतीत चित्रपटगृहांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाने करण जोहर भारावून गेला आहे. आता त्याने चित्रपटाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

करण काल ‘इंडियन एक्सप्रेस’च्या एक्सप्रेस अड्डा’मध्ये सहभागी झाला होता. यादरम्यान बोलताना करण जोहरने या चित्रपटाबद्दल भाष्य केलं. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे तो खूप आनंदी आहे असं त्याने सांगितलं. करण पुढे म्हणाला, हा चित्रपट प्रेक्षकांना इतका आवडेल याची त्याला अपेक्षा नव्हती असं नाही. मात्र, गेले काही महिने इंडस्ट्रीतील वातावरण एकदम गढूळ होतं. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने स्वतः तब्बल सात वर्षांनी एका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

आणखी वाचा : “सेटवर रणवीर-आलिया…”, क्षिती जोगने सांगितला करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये काम करण्याचा अनुभव

करण जोहरने सांगितलं की, गेली तीन वर्षे त्याच्यासाठी चांगली नव्हती आणि इंडस्ट्रीमध्येही अशीच परिस्थिती होती. यादरम्यान त्याच्यात एक नकारात्मकता होती. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याला पॅनिक अटॅक येत होते.

हेही वाचा : आलिशान घर, गाड्या, कोट्यवधींचा व्यवसाय अन्…; जाणून घ्या करण जोहरची संपत्ती, वर्षाला कमवतो ‘इतकी’ रक्कम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या चित्रपटात आलिया आणि रणवीरशिवाय धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर आतापर्यंत या चित्रपटाने आतापर्यंत २१० कोटींची कमाई केली आहे.