बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल करिअर याबद्दल कायमच स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नुकतंच तिने आपला पती आणि अभिनेता सैफ अली खानबद्दल आणि त्याच्या स्टाईलबद्दल भाष्य केलं आहे.

नुकतंच एका मुलाखतीमध्ये करीनाने सैफच्या साधेपणाबद्दल भाष्य केलं आहे. तिने सांगितल्याशिवाय सैफ अजिबात कपड्यांची खरेदी करत नाहीत, ज्यात आहे त्यात तो समाधानी असतो असं करीनाने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं आहे. एवढा साधा असूनही त्याच्यासारखं स्टायलिश राहणं प्रत्येकालाच जमत नाही असाही दावा करीनाने या मुलाखतीमध्ये केला.

आणखी वाचा : अयान मुखर्जीने दिलं आणखी एक सरप्राइज; हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सांभाळणार धुरा

पिंकव्हीलाशी संवाद साधताना करीना म्हणाली, “सैफ आजही घरात ५ वर्षं जुनी ट्रॅक पॅन्टची जोडी वापरतो, त्याच्या टी-शर्टला ५ भोकं पडली आहेत हे मी सांगूनही तो ती गोष्ट फार मनावर घेत नाही. इतका साधा असूनही तो प्रचंड स्टायलिश आहे. सैफला कुणीही स्टाईल शिकवू शकत नाही, मला वाटतं ती स्टाईल त्याच्यात उपजतच आली आहे. त्याची निवड खूप उत्तम आहे मग ते कपडे असो, इंटिरियर असो, खायचे पदार्थ असो, पुस्तकं असो या सगळ्याच बाबतीत त्याची निवड अप्रतिम आहे. स्टाईल ही त्याच्या रक्तात आहे.”

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीना ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत थ्री इडियट्स, बजरंगी भाईजान, जब वी मेट असे अनेक चित्रपट केले आहेत. याबरोबर नुकतीच ती आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकली. सध्या ती तिच्या आगामी ‘द क्रू’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.