बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने रविवारी ६ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. आलिया-रणबीरला कन्यारत्न झाल्याने कपूर कुटुंबियांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. छोट्या परीच्या आगमनासाठी कपूर कुटुंबीयही उत्सुक आहेत. रणबीरची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरलाही आपल्या भाचीला भेटण्याचा मोह अनावर होत आहे.

आलिया आई झाल्याची गोड बातमी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे चाहत्यांना दिली. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली होती. “आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची बातमी. आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती खूप मनमोहक आहे. आज अधिकृतरित्या आम्ही भरभरून प्रेम, आशीर्वाद मिळालेले पालक आहोत. खूप खूप प्रेम,आलिया आणि रणबीर”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> “अपूर्वा नेमळेकर घरात फक्त अभिनय…”, ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या योगेश जाधवचा खुलासा

हेही वाचा >> “आलिया आणि तिचं बाळ…”, प्रसुतीनंतर सून आणि नातीच्या तब्येतीबाबत नीतू कपूर यांनी दिली माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाच्या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या. या पोस्टवरील करीना कपूरची कमेंट चर्चेत आहे. करीनाने आलियाच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या गोंडस मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “उफ माझी छोटी आलिया. तिला पाहण्यासाठी उत्सुक आहे”, अशी कमेंट केली आहे. करीना सध्या शूटिंगसाठी लंडनला गेली आहे.

हेही पाहा >> Photos : ‘वो लडकी है यहाॅं’, सोनाली कुलकर्णीचं शर्टमध्ये हॉट फोटोशूट, नव्या लूकवर चाहतेही फिदा

kareena kapoor excited to meet alia bhatt baby girl

आलिया-रणबीरने एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर दोनच महिन्यात आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी त्यांनी चाहत्यांना दिली. आलिया-रणबीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यामुळे चाहतेही आनंदी आहेत.