अभिनेत्री करीना कपूर-खान नेहमीच तिच्या स्टाईल, तिची मुलं आणि चित्रपटातील भूमिका यांमुळे चर्चेत असते. पतौडी पॅलेसवरील कुटुंबीयांबरोबर घालवलेला वेळ, तेथील फोटोज करीना शेअर करीत असते. या फोटोजमध्ये सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता यांची मुलं सारा अली खान व इब्राहिमही दिसतात. करीनानं एकदा तिचा आणि सारा व इब्राहिमचा बॉण्ड, तसेच सैफ आपल्या चारही मुलांना कसा वेळ देतो यावर करीनाला काय वाटतं या सर्वांवर आपलं मत मांडलं होतं.

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्न केलं आणि त्यांना तैमूर व जेह अशी दोन मुलं आहेत. सैफला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं (सारा आणि इब्राहिम) असल्याचं करीनाला ठाऊक होतं आणि त्यानं त्याच्या सर्व मुलांना समान वेळ देणं महत्त्वाचं असल्याचं ती मान्य करते, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनेता सैफ अली खान त्याच्या सर्व मुलांना कसा वेळ देतो यावर करीनानं एकदा प्रतिक्रिया दिली होती. तसंच सारा व इब्राहिम यांच्याबरोबर नातं तयार करणं तिला अजिबात अवघड वाटल नव्हतं, असंही तिनं स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा…“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”

मी सारा व इब्राहिमची आई होणार नाही – करीना कपूर

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये करीनानं एकदा सांगितलं होतं की, ती सारा व इब्राहिमची आई होणार नाही, असं तिनं ठरवलं होत. कारण- त्यांना आधीच एक सुंदर आई आहे; मात्र मी त्यांची एक चांगली मैत्रीण होऊ शकते, असं करीना म्हणाली होती.

सैफ आपल्या मुलांना कसा वेळ देतो?

करीनाने ‘कॉफी विथ करण’च्या एका सीझनमध्ये सैफ सारा व इब्राहिमबरोबर बॉण्ड (बंध) तयार करण्यासाठी कसा विशेष वेळ काढतो हे सांगितलं होतं. तैमूर व जेह असूनही सैफ त्यांच्या मोठ्या मुलांनाही वेळ देतो, असं करीनानं सांगितलं होतं. “सैफ नेहमी म्हणतो की, मी सारा किंवा इब्राहिमबरोबर वेळ घालवणार आहे. मी एकटा जाऊन त्यांच्याबरोबर आरामात वेळ घालवणार आहे. मला त्यांना वेळ द्यायचाय. करीना म्हणते की, त्यांनी एकत्र सुट्याही घालवल्या आहेत. मला वाटतं की, त्यांनी एकत्र वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याकडे सगळं आहे; पण त्यांच्याकडे एकच वडील आहेत आणि सैफनंही त्याच्या प्रत्येक मुलाला तो वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. लोक यावर अनेक चर्चा करतात; पण माझ्या मनात त्याबद्दल कोणतंही द्वंद्व नाही,” असं करीनानं सांगितलं होतं.

हेही वाचा…आलिया भट्टच्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर पाहून सासूबाई नीतू कपूर म्हणाल्या, “अंगावर शहारे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारा व इब्राहिम प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी सैफ व करीनाच्या घरी येतात आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर आनंदानं वेळ घालवतात हे त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंमुळे दिसतं. सैफनं १९९१ साली अमृता सिंगबरोबर पहिलं लग्न केलं होतं आणि २००४ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.