ज्येष्ठ अभिनेते आणि लोलो व बेबोचे वडील रणधीर कपूर यांनी मनोरंजनसृष्टीत १९७० च्या दशकात त्यांचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पिढ्यान् पिढ्या मनोरंजनसृष्टी गाजविणाऱ्या या कपूर कुटुंबाच्या मुली करिश्मा व करीनानंदेखील बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. या दोन्ही बहिणींनी वडिलांच्या पाठिंब्याशिवाय स्वतःहून बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याबाबतची माहिती रणधीर कपूर यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्टपणे मांडली होती.

रेडिओ ९२.५ चॅनेलच्या होस्टला दिलेल्या मुलाखतीत रणधीर म्हणाले होते, “मला माझ्या मुलींचा खूप अभिमान आहे. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर हे सगळं मिळवलंय. बबितानं त्यांना खूप सपोर्ट केला. मी त्यांच्या आईला पूर्ण श्रेय देऊ इच्छितो. त्या दोघींनीदेखील खूप मेहनत घेतली आहे.

हेही वाचा… बाबा झाल्यावर वरुण धवनने केली पहिली पोस्ट, लेकीच्या जन्माची दिली गुड न्यूज, म्हणाला…

रणधीर पुढे म्हणाले होते, “जेव्हा त्या दोघी खूप लहान होत्या तेव्हा मी याचा विचारच केला नव्हता केला की, मोठं होऊन त्या दोघी एवढ्या मोठ्या आर्टिस्ट बनतील. मला जे माझ्या बाबांनी (राज कपूर) सांगितलं तेच मी त्यांना सांगितलं की, तुम्हाला जर हे करायचंय, तर नक्की करा. जर हे वाईट प्रोफेशन असतं, तर आम्हीदेखील या प्रोफेशनमध्ये नसतो. जर आम्ही हे काम करतोय, तर आम्ही तुम्हाला या प्रोफेशनमध्ये जाण्यापासून कसं रोखू शकतो. पण जर तुम्ही हे करताय. तर त्यात उत्कृष्ट कामगिरी करा. मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की, माझ्या दोन्ही मुलींनी माझ्या पाठिंब्याशिवाय यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतलीय.”

हेही वाचा… दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरी राहायला आली अदा शर्मा; म्हणाली, “मला सकारात्मक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणधीर असंही म्हणाले होते, “मी खूप वाईट बाबा आहे. (मैं बावला हू) सगळ्यांना माहितेय की, मी थोडा वेडा आहे. मला आता फार कष्ट करायचे नाहीत. मला आता चित्रपटांमध्ये काम करायचं नाही. मला अजूनही ऑफर येतात; पण त्या मी नाकारतो. मी माझ्या आयुष्यात जेवढ हवं तेवढं कमावलं आहे. आता माझी मुलं माझ्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी कमवतात. त्यामुळे मी समाधानी आहे. आमच्याकडे अन्न, कपडे व घर आहे. आमच्याकडे सर्व काही आहे. मग मला आणखी काय हवं. मी कशाला या वयात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामासाठी धावत राहायचं.”