Karisma Kapoor ex husband Sunjay Kapur Death: बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा एक्स पती व उद्योगपती संजय कपूर यांचे निधन झाले आहे. इंग्लंडमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये ही घटना घडली. पोलो खेळत असताना संजय कपूर खाली कोसळले, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

संजय कपूर हे एक प्रसिद्ध उद्योगपती होते आणि त्यांना पोलो खेळण्याची खूप आवड होती. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय व मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

संजय कपूर यांचे निधनाआधीचे एक ट्विट सध्या व्हायरल होत आहे, जे त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी पोस्ट केले होते. हे ट्विट अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल होते. “अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांबरोबर आहेत. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो”, असं संजय कपूर यांनी लिहिलं होतं.

sunjay kapoor last post ahmedabad plane crash
अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल संजय कपूर यांची पोस्ट (सौजन्य – एक्स )

संजय कपूर यांनी अहमदाबाद अपघाताआधी आयुष्यासंदर्भात एक पोस्ट केली होती. “पृथ्वीवरील तुमची वेळ मर्यादित आहे. जर तरच्या गोष्टी तत्वज्ञानींवर सोडा आणि त्याऐवजी ‘का नाही’ याचा आधी विचार करा,” असं त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिलं आहे. ९ जून रोजी संजय कपूर यांनी ही पोस्ट केली होती आणि १२ जून रोजी त्यांचं निधन झालं. निधनाच्या अवघ्या ३ दिवसांपूर्वीची त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. त्यांना मृत्यूची चाहूल लागली होती का? अशी चर्चा त्यांच्या या पोस्टनंतर होत आहे.

sunjay kapoor last post your time on earth
संजय कपूर पोस्ट (सौजन्य – एक्स)

२२ वर्षांपूर्वी करिश्मा-संजयचं झालेलं लग्न

संजय कपूर हे बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती होय. करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे २००३ मध्ये लग्न झाले होते. या लग्नातून त्यांना दोन अपत्ये झाली. मुलगी समायरा आणि मुलगा कियान. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि २०१४ मध्ये करिश्माने घटस्फोटासाठी अर्ज केला. २०१६ मध्ये त्यांचा कायदेशीररित्या घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या वेळी करिश्माने संजयवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी मानसिक व भावनिक छळ केला असं करिश्मा म्हणाली होती.

करिश्मा ही संजय कपूरची दुसरी पत्नी होती. करिश्मापासून घटस्फोट झाल्यावर संजय कपूर यांनी प्रिया सचदेवशी तिसरं लग्न केलं होतं. प्रियाने काही काळापूर्वी एका मुलाला जन्म दिला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय कपूर यांच्या निधनाची बातमी आल्यावर लोक सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पण करिश्मा कपूर किंवा कुटुंबाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.