Karisma Kapoor Revealed About Kissing Scene In Raja Hindustani: बॉलीवूडचे काही चित्रपट हे दीर्घ काळपर्यंत प्रेक्षकांच्या लक्षात राहातात. अशाच चित्रपटांपैकी एक म्हणजे १९९६ साली प्रदर्शित झालेला राजा हिंदुस्तानी हा सिनेमा. या चित्रपटातील कथेसह गाण्यांनीदेखील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात आमिर खान व करिश्मा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटामधील करिश्मा कपूर व आमिर खान यांच्यातील किसिंग सीनची त्या काळात चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर एका मुलाखतीत अभिनेत्री करिश्माने त्याबाबत वक्तव्य केले होते. हा सीन करताना त्या दोघांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागाला, याबद्दल तिने खुलासा केला होता.

त्या सीनचे शूटिंग करताना…

राजीव मसंदला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री करिश्मा कपूर म्हणालेली, “सिनेमातील किसिंग सीनची लोक चर्चा करतात. मात्र, त्या सीनचे शूटिंग करताना आम्ही खूप कठीण काळातून गेलो आहोत, अडचणींचा सामना केला आहे. फेब्रुवारी महिन्यात उटीमध्ये शूटिंग सुरू होते. आम्ही तीन दिवस किसिंग सीनचे शूटिंग करीत होतो. त्या सीनचे शूटिंग कधी संपणार, असा आम्ही विचार करीत होतो.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “तिथे खूप थंडी होती. थंड पाणी, वादळ अशा परिस्थितीत आम्ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत शूटिंग करीत असायचो. थंडीने आम्ही थरथरत होतो. मला वाटते की, अशा परिस्थितीत काम करण्याचा तो एक वेगळाच काळ होता”, असे म्हणत अभिनेत्रीने राजा हिंदुस्तानीमधील किसिंग सीन शूटिंग करण्याची आठवण सांगितली होती.

याआधी ‘राजा हिंदुस्तानी’चे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी ‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत या सीनच्या शूटिंगबद्दल वक्तव्य केले होते. धर्मेश दर्शन म्हणाले होते की, त्या सीनच्या शूटिंगदरम्यान करिश्माची आई बबिता कपूर तीनही दिवस सेटवर हजर होत्या. त्या खूप उत्साही होत्या. करिश्मा कपूरने याआधी किसिंग सीन केला नसल्याने त्या तिला टिप्स देत होत्या. मी बबिताजींना तो पूर्ण सीन समजावून सांगितला. करिश्माची प्रतिमा सर्वांसमोर चांगली होती. मी त्यांना सीनदरम्यान दुसरीकडे जाण्यास सांगितले नाही.

करिश्मा कपूर व आमिर खान यांच्याबरोबरच या चित्रपटात कुणाल खेमू, जॉनी लिव्हर व अर्चना पूरन सिंह हे कलाकार प्रमुख भूमिकांत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.